सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Thursday, May 30, 2013

संधीवात


संधिवात

   तिशीनंतरच्या वयात 14 टक्के शहरीतर 18 टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. काही सर्वेक्षणांमध्ये तर याहीपेक्षा जास्त प्रमाण सापडले आहे. हजारात एखाद्या मुलाचे सांधे दुखतात. जीर्ण आजारांपैकी पहिले पाच म्हणजे हृदयरोगमधुमेहपक्षाघातकर्करोग आणि संधिवात. यापैकी वेदना आणि अपंगत्व निर्माण करणारा सर्वांत महत्त्वाचा रोग म्हणजे संधिवात. संधिवाताविषयी जागरुकता कमी आणि गैरसमजुती जास्त. त्यामुळे आजार बळावत जातो आणि पांगळेपणा येतो. लवकर निदान झाले आणि योग्य उपचार केले तर संधिवाताचे नियंत्रण करणे शक्‍य आहे.संधी म्हणजे सांधा. शरीरात असे सुमारे 200 सांधे आहेत. त्यापैकी अर्धेअधिक मणक्‍यात असतात. सांध्याचे मुख्य कार्य म्हणजे हालचाल. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. यालाच इंग्रजीत ऱ्हुमॅटिझम म्हणतात. संधिवात हा आजार नसूनलक्षण आहे. संधिवात हे लक्षण असणारे सुमारे शंभरएक आजार आहेत. त्याच्या अचूक निदानाचे आणि औषधोपचाराचे वैद्यकशास्त्र म्हणजे ऱ्हुमॅटॉलॉजी.संधिवाताचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. झिजेचे आणि सुजेचे. वयोमानाने सांध्यांची कूर्चा झिजते. मार लागणेसांध्याची शस्त्रक्रियाआमवातस्थूलताव्यवसायामुळे सांध्याचा अतिवापरव्यायामाच्या अभावाने स्नायूंचा अशक्तपणाअशी याची मुख्य कारणे. मानेचेतसेच कंबरेचे मणके (स्पॉंडिलोसिस) आणि गुडघाखांदाघोटातसेच बोटांच्या सांध्यांत अशी झीज होते. झिजेमुळे हे सांधे दुखतात व हळूहळू अकार्यक्षम बनतात. काम केल्यानंतर (उदा.- जिने चढताना गुडघे दुखणेदिवसभर कॉम्प्युटरवर बसून संध्याकाळी मान किंवा कंबर दुखणे) हे झिजेच्या संधिवाताचे मुख्य लक्षण. हळूहळू दुखणे वाढून सांधा सतततसेच रात्रीही दुखत राहतो. कालांतराने "हार्टफेल'सारखा सांधाही "फेलहोतो.सुजेचे संधिवात हे जास्त गंभीर. पंचवीसेक आजारांत सांध्यांना सूज येते. त्यालाच आयुर्वेदात आमवात म्हटले आहे. लुपसस्क्‍लेरोडर्मासंग्रहणीसारकॉइडकर्करोगचिकुनगुनियाक्षयएड्‌स अशा अनेक आजारांत सांध्यांना सूज येते. संधिवाती आमवातात हातपायांची बोटेतसेच मनगट आणि घोट्याचे असे अनेक सांधे सुजतात व दुखतात. सकाळी उठल्यावर किंवा विश्रांतीनंतर सांधे कडक राहतात. हलवता येत नाहीत आणि हालचालीनंतर काहीसे सैल होतात. सुजेमुळे सांधे आतून खराब होतात आणि कधीही न भरून येणारी हानी होते. बोटे आणि इतर सांधे वेडेवाकडे होतात. ताप येणेडोळे कोरडे पडणेथकवाभूक न लागणे अशी लक्षणेही सोबत असतात. रक्तवाहिन्यामूत्रपिंडफुफ्फुसे आणि हृदय अशा अनेक अवयवांवरील परिणामांमुळे आमवातात रुग्णांचे आयुष्य सुमारे सात वर्षांनी कमी होते. वेदना आणि व्यंग यामुळे मनाला उदासीनता येते ती वेगळीच.आमवात बहुधा तरुण किंवा मध्यम वयाच्या स्त्रियांना होतो. तरुण मुलींना लग्नाचा प्रश्‍नघरातील कर्ती स्त्री अपंग झाली की संसाराचा गाडा हाकण्याचा प्रश्‍न... अनेक सामाजिक समस्या आमवाताच्या अनुषंगाने येतात. औषधांचा खर्चकाम न करता आल्याने होणारे आर्थिक नुकसान हे वेगळेच. सारेच संधिवात स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असलेतरी आऊट आणि ऍन्किलोसिंग स्पॉंडिलायटिस हे पुरुषांमधले विशेष संधिवातगाऊटचे ऍटॅकऍन्किलोसिंग स्पॉंडिलायटिसचे कडक कंबरेचे दुखणेअसे त्रास सहन करत हे तरुण कसेबसे आयुष्य काढत असतात. लहान मुलांना संधिवात झाला तर वाढ खुंटते आणि उभ्या आयुष्याचा प्रश्‍न उभा राहतो. गेल्या वीसएक वर्षांत नवी औषधेतसेच मार्गदर्शक तत्त्वांमुळे संधिवाताच्या उपचारांमध्ये क्रांती झाली आहे. शस्त्रक्रियांचे प्रमाणही कमी झाले आहे. शिवाय एखाद्या सांध्याची शस्त्रक्रिया झाली तरी इतर अनेक सांध्यांसाठी उपचार लागतातच. लवकर निदान झाले तर योग्य उपचारांनी सांधे पूर्ववत होऊ शकतातव्यंग टाळता येते आणि शस्त्रक्रिया लांबवता येते. त्यासाठी समाजामध्ये व डॉक्‍टरांमध्येही जागरुकता निर्माण होणे अत्यावश्‍यक आहे.

अधिक  माहिती साठी  हा कार्यक्रम  ऐका 
http://www.youtube.com/watch?v=soPrk9IAXpM