सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Friday, November 21, 2014

साला एक मच्छर .....
एवढे म्हटले कि नानापाटेकर आठवतंय ना .. मला वाटते क्रांतीवीर मधला संवाद आसावा .. डासांचा पराक्रम तसा खुप मोठ्ठा आहे , कसाब पासुन सर्व सामान्यांपर्यंत सर्व त्रस्त ...
पाच सहा वर्षानन्तर अनेक ठिकाणी झालेला अमाप पाऊस काही ठिकाणचा दुष्काळ आणि त्यातच आवध्या महाराष्ट्रभर चालु असलेली डेंगू आजाराची लागण आणि वाढता प्रभाव यामुळे सर्वत्र चिंतेचा आणि चर्चेचा विषय ..
मुम्बई आणि राज्यात रोज नवीन निदान होणारे डेंगूचे रुग्ण याने आरोग्य प्रशासन आणि प्रशासन ,आरोग्य व्यवस्था उपचार करतांना डॉक्टरांना येणाऱ्या आडी- अडचणी व डॉक्टरांची होणारी त्रेधातिरपट पाहून नाना पाटेकरच्या चित्रपटाच्या संवादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही ...`` साला एक मच्छर ......
साला एक मच्छर आदमी को .....
एडीस इजिप्ती या एका प्रकारच्या डासांनी आक्षरश: धुमाकूळ घातला आहे
पहिल्यांदा चिकुन गुनिया आणि आत्ता डेंगू ने दहशत निर्माण केली आहे .
डेंगू हा एडीस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत फैलावला जाणारा आजार आहे .हा सर्व साधारण पणे उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळतो डेंगू विषाणू हा अर्बो व्हायरस (Arbo Virus ) या प्रकारातील आहे .त्याचे पुन्हा काही उपप्रकार पडतात . जसे कि D1,D2,D3,D4 .
डेंगूचा संसर्ग झाल्यांनतर त्याचे साधारणतः दोन प्रकार पडतात
१) लक्षाणा विरहित डेंगू
२) लक्षणा सहित डेंगू
लक्षणा विरहीत डेंगू :---
या प्रकारात जरी एखाद्या व्यक्तीला याचा संसर्ग आणि लागण जरी झाली तरीही तो निरोगी व कुठल्याही प्रकारची लक्षणे नसतात .
लक्षणासहित डेंगू :--
या मध्ये प्रामुख्याने ३ प्रकार पडतात ..
१) सर्व लक्षणासहित डेंगू चा ताप .. ( Classical Dengue Fever )
२) रक्तस्राव होऊन रक्तदाब कमी करणारा ( शॉक) डेंगू चा ताप ( Dengue Haemorrhagic Fever )
३) रक्तस्राव होऊन रक्तदाब कमी न करणारा ( Dengue Without Shock )
डेंगू चा प्रसार :-
एडीस इजिप्ती या एका प्रकारच्या डासांच्या मार्फत या डेंगू आजाराच्या विषाणूंचा प्रसार होतो . हा डास सर्व साधारण डासापेक्षा मोठ्ठा काळा व त्याच्या अंगावर पांढरे वाघासारखे चट्टे आसतात त्यामुळे त्याला टायगर मोस्कुटो ( Tiger Mosquito ) म्हणूनही संबोधले जाते .
साधरणपणे हा डास दिवसा चावतो .
त्याही उत्पत्ती साधारण पणे साठवलेल्या गोड्या पाण्यातच होते .
उदा:- जुन्या टायर मध्ये साचलेल्या पाण्यात . नारळाच्या करवंट्या ,फुलदाणी , फिश टंक ( Fish Tank ) झाडांच्या डोलीत असणाऱ्या पाण्यामध्ये .
डेंगू चा ताप :-
डेंगू च्या तापेला ( Break Bone Fever ) हाडे मोडणारा ताप असाही उल्लेख केला जातो, या आजारामध्ये रुग्णाला असह्य तीव्र हाडांच्या , सांध्यांच्या वेदनेमुळे याला हाडे मोडणारा ताप आस हि उल्लेख केला जातो , आणि विशेष म्हणजे हाच डास चिकुन गुनियाही फैलावतो त्यामुळे बराच वेळा दोन्ही हि त्रास बरोबर आसू शकतात .
डेंगू ची लक्षणे :-
१) अचानक थंडी वाजुन तीव्र ताप , ताप सर्व साधारण पणे १०२ ते १०५ f. आसू शकते
२) तीव्र स्वरुपाची डोके दुखी:- या मध्ये डोळ्याच्या खोबणीमागे , बुबुळामागे तीव्र स्वरूपाच्या असह्य वेदना
३) तीव्र स्वरुपाची अंगदुखी व आस्तीदाह्
४) अशक्त पणा , मळमळ , भूक न लागणे . उलट्या ,पोटदुखी
५) घशाला कोरड पडणे , बद्धकोष्ठता
६) डोळे लाल होणे ,, चेहरुयावर सुज येणे
७) आजार बळावल्यास कवीळ , पोटदुखी, रक्तस्राव इत्यादी
रक्तस्राव होणारा डेंगू चा ताप ( DHF) :-
जेव्हा डेंगू आजार बळावला जातो व ज्यावेळी डेंगू एकापेक्षा जास्त दोन प्रकारच्या डेंगूच्या विषाणूमुळे डेंगू होतो त्यावेळी संवेदन शील प्रतिकारशक्ती मुळे ----
· अचानक जास्त प्रमाणात ताप येऊन तो २ ते ७ दिवस राहू शकतो
· यकृतावर सुझ येऊन त्याची वाढ व तीव्र पोटदुखी , कळ येणे
· तीव्र स्वरुपाची अंगदुखी व सांधेदुखी
· रक्तस्राव प्रामुख्याने
- त्वचेखाली रक्तस्र्ताव होऊन त्वचा निळी काळी . लाल दिसणे
- ( Patechial Haemorrhage )
- अंगावर लालसर पुरळ
- नाकातून रक्तस्राव ( Epitaxis)
- हिरड्या मधून रक्तस्राव ( Bleeding Gums )
- संडास मधून रक्तस्राव ( Malena )
- लघवी द्वारे रक्तस्राव ( Haematuria )
प्रयोगशाळेतील काही चाचण्या :-
- रक्तातील डेंगू च्या Antibodies test – IGM AND IGG
- रक्तातील पांढऱ्या पेशी आणि रक्त गोठवणाऱ्या कोशिकांची तपासणी
( complet haemogram , Leucocyte and Platlet count )
होमिओपॅथिक उपचार व प्रतिबंध :-
होमिओपॅथिक उपचार पद्धतीने रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवुन डेंगू चा उपचार आणि प्रतिबंध करणे सहज शक्य आहे .
कुठलाही दुषपरिनाम न होता ( By Immunomodulation of patient with out any side effect & adverse effect )
होमिओपॅथिक औषधांची निवड रुग्णांची प्रतिकार शक्ती , विषाणूंची बधाक्कता व रुग्णांची लक्षणे यावर आधारित व अवलंबून आसतात .
होमिओपॅथिक उपचार पद्धती हि निसर्गाच्या नैसर्गिक नियमावर आधारित आसून पूर्णता:शास्त्रीय आहे .
सम सम: सामायन्ति ” (Similia Similibus Curanter) या तत्वा वर आधारित आहे .
होमिओपॅथिक औषधी रुग्णाची शाररिक , मानसिक ,प्रतिकार शक्ती वाढवतात .त्यामुळे विषाणूचा जरी संपर्क किव्हा संसर्ग झाला तरी फारसा त्रास जाणवत नाही .
होमिओपॅथी मध्ये डेंगू साठी कमीत कमी २५-३० पेक्षाही जास्त औषधी उपलब्ध आसून त्यांच्या मध्ये आजार बारा करण्याची व प्रतिबंध करण्याची क्षमता आहे . हे मागे भारतात व भारत बाहेरील देशामध्ये सिद्ध झालेले आहे .
हि औषधी पूर्णता: सुरक्षित व दुष्परिणाम विरहीत आहेत .हि औषधी कुठल्याही वयोगटातील व्यक्ती तसेच गरोधर स्रीया हि घेऊ शकतात. योग्य उपचार अधिकृत डॉक्टरांकडूनच घेणे आवश्यक योग्य आणि हितावह आहे .
अलीकडे औषधांची नावे डॉक्टरांकडून घेऊन घरच्या घरी उपचार करणाऱ्या मंडळींची संख्या रोडावत आहे ,हि प्रवृत्ती आरोग्यास घतक आहे .त्यामुळे या लेखात मुद्धामच औषधांची नावे टाळत आहे .
प्रतिबंध :-..
या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी :--
१) सामाजिक जागरूकता:
२) डासांचा प्रतिबंध
सामाजिक जागरूकता: :-
१) Prevention is always better than cure आजार झाल्या नंतर उपचार करून बरे होण्यापेक्षाही आजार होऊच नये हि खबरदारी खुप महत्वाची आहे , नुकतेच आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी साहेबांनी हि स्वछेते बद्दल खुप छान संदेश दिला आहे आपण हि सर्व जन मिळून आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेऊ या आणि आजार दूर ठेऊ यात..
२) या आजारामध्ये बऱ्याच वेळा रक्त गोठवणाऱ्या कोशिका
(platlets ) कमी होतात त्यामुळे रुग्णांना रक्त आथवा Pletlets
देण्याची बऱ्याचवेळा गरज पडते . तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान करणेही गरजेचे एक सामाजिक जबाबदारी म्हणून स्वेच्छेने रक्तदान करावे .
प्रतिबंध :-
विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून डासांची उत्पती स्थाने नष्ट करावीत अथवा चावाण्यापासून प्रतिबंध करणे
· पाण्याच्या टाक्या कंटेनर यावर झाकणे टाकणे , वरच्यावर साफ करणे
· कोरडा दिवस पाळणे
· मच्छर दानी , डास विरोधार आगरबत्ती , मलम वापरणे
· डास विरोधी औषधांची फवारणी
ताप आल्यानन्तर लवकरात लवकर अधिकृत डॉक्टरांशी संपर्क साधावा मनाने औषधी घेणे शक्यतो टाळावेत
आजाराविषयी भीती :-
ढोबळ मनाने लेख वाचून / आजाराची माहिती घेतल्यास विशेष आसे काही जाणवत नाही परंतु (DHF ) रक्तस्राव होणारा डेंगू चा ताप हा सर्वात धोकेदायक आजार आहे. यामध्ये नाकातून ,तोंडातून ,लघवीवाटे ,संडास वाटे ,राक्तस्राव होऊन रुग्ण बेशुध्द होण्याचे प्रमाण अधिक आहे व रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आसते . हीच एक चिंताजनक आणि धोके दायक बाब आहे . वरील पैकी कुठलीही लक्षणे आढळ्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या व गरज पडल्यास रुग्णलयात दाखल करावे ..