सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Wednesday, September 28, 2016

रुग्णांना पांढरे दाग आसले कि विविध प्रश्न पडतात
जर त्यांना त्यांची योग्य उत्तरे मिळाली तर ते पांढरे दाग असूनही सुसह्य जीवन जगू शकतात .
माझ्याच बाबतीत आस का ?
रुग्णांना पांढरेदाग हा विकार जडल्यानंतर धक्काच बसतो आणि आपल्या त्वचेला काय झालं आहे या विचाराने तो घाबरून , गोंधळून जातो .
आपले शरीर आपल्याला दगा देत आहे असं त्यांना वाटते .
कदाचित आसे प्रश्न तुम्हाला , रुग्णांना पडले आसतील …………….
. खरंच हे पांढरे दाग आसु शकतील का ?
हा विकार बारा होऊ शकेल का ?
अंगावर वर हे दाग आसे का वाढत चालले आहेत
मला उपचार करायला हवेत ही गंभीर गोष्ट आहे का ?
कोणती औषधे मला मद्दत करतील ?
मी औषधी कशी घ्यायची ?
औषधी फक्त वरूनच लावायची का ?
औषधाचे काही दुष्परिणाम होतात का?
चांगल वाटल्यावर औषधी बंद केली तर चालतील का ?
मला सर्व सामान्य जीवन जगता येईल का ?
या आणि आशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आमच्या कडे आहेत आणि आम्ही ह्या लेखाच्या आधारे तुम्हाला देत आहोत.
हा लेख तुम्हा;ला काही मुलभूत गोष्टींची माहिती देईल , तसेच रुग्णावर सहज सुरक्षित आणि परिणाम कारक इलाज कसे होऊ शकतील. हे आपणास सांगेल .
इतकच नाही तर याचा हेतू आहे रुग्णांना निरोगी कार्यशील जीवन जगता येणे शक्य आहे असा विश्वास देण्याचा , तुम्ही पांढरे डागांवर सहज विजय मिळवू शकता , तुम्हाला वाटते त्याहूनही अधिक ते सोप्पे आहे ते ..
टीप — सकारात्मक विचार करा पण त्याच बरोबर पांढरे दाग हा गंभीर आजार आहे. याची ही जाणीव ठेवा , त्यावर उपचार केलेच नाही किव्हा केलेले उपचार योग्य नसतील तर ते धोक्कादायक ठरू शकतो .
खरंच हे पांढरे दाग आसू शकतील का ?
===========================
रुग्णांना जर त्वचेवर पांढरट लालसर दाग दिसू लागले कि वाटते कि पांढरे डागच आहेत कि काय , एखाद्या वेळेस ती जखमीची खूण आसू शकते किव्हा आणखी काही ते पडताळून पाहण्यासाठी व निदान करण्यासाठी डॉक्टर तुमची इतर लक्षणे ही बघतात .
— जसे कि डागांचा रंग
— त्यांची वाढ
— शरीरावर इतर कुठे दाग आहेत का ?
— तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयी
— डागांचे आकारमान . इत्यादी
काही कारणांमुळे अचानक शरीरावर दाग दिसू लागतात ..
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
अतिशय ताप येऊन गेल्या नंतर
टायफाईड चा ताप येऊन गेल्या नंतर
काही न भरणाऱ्या जखमा
मानसिक तन तणाव ‘
अस्वस्थ पणा
अतिशय औषधी सेवन
काही वेळा असा समज आसतो कि पांढरे दाग असल्यावर नेहमीच वाढतात .
हे खरे नाही कधी कधीच ही समस्या उदभवू शकते.
काही जनात पांढरे डागांची अनेक लक्षणे आढळतात तरी काही जनात त्वचेचा रंग फिक्कट पांढरट जाणवतो ही लक्षणे कोणत्याही वयात उद्भवू शकतात काळानुसार ह्यात बदलही घडू शकतात काही दिवसांनी ती दिसेनाशी होउन पुन्हा कधी कधी कित्येक वर्षांनी दिसू लागतात .
या करणा मुळे डॉक्टर तुम्हाला तुमच्या आजाराविषयी सखोल विचारतात . मागील आजाराविषयी आजाराच्या लक्षणाविषयी , तुमची कुटुंबातल्या सदस्यांच्या आजाराविषयी सविस्तर विचारतात . ती किती काळ टिकतात , कित्ती तीव्र आहे , ती एका विशिष्ट पद्धतीने येतात का … यावरून त्यांचे निदान करतील .
टीप —
आपल्या पूर्ण कुटुंबाची आरोग्य विषयक चौकशी आपली शाररिक तपासणी करूनच डॉक्टर त्याचे निदान करतील , त्यासाठी सहकार्य अनिवार्य
आहे .
पांढरे दाग …. बरे होऊ शकतात का ?
++++++++++++++++++++++++++++
यावर उत्तर म्हणजे हो, नक्कीच बरे होऊ शकतात..
औषधी , काही पथ्ये काळजी घेऊन ., सगळ आयुष्य शापिताप्रमाणे जगण्यापासून व इतर लक्षणांपासून होणारा त्रास तुम्ही कायमचा थांबवू शकता .
योग्य उपचार आणि काळजी घेऊन तुम्ही या किचकट आजारापासून मुक्ती मिळवू शकता .
औषधी चालू केल्यांनतर , चालू आसताना हा फरक जाणवेल
— पांढरे दाग दिसण्याचे प्रमाण कमी होऊ लागेल .
— पुढील वाढ थांबवली जाईल
— शाररिक कुरूपता येणार नाही
— तुम्ही सर्व सामान्य आणि कार्यशील जीवन जगू शकाल
टीप –
कित्येक जन पांढरेदाग होण्याची प्रवृत्ती घेऊनच जन्माला येतात , तो वंश परमपरेने येऊ शकतो , पूर्वीच्या पिढ्यातील पांढरे दाग असलेल्या लोकांना आयुष्य भर कुंठीत जीवन व्यतीत करावे लागत होते , पण आत्ता आधुनिक संशोधित होमिओपॅथिक औषधांमुळे तुम्ही पांढरे डागांवर चांगे नियंत्रण व उपचार करून पूर्णतः बरे होऊ शकता व इतरांसारखे सुंदर आयुष्य जगू शकता .
कधी कधी पांढरे दाग अनेक पिढ्या ओलांडून पुढे जातो , त्यामुळे कुटुंबातल्या प्रत्येकाला पांढरेदाग होतातच आसे नाही , आईला किव्हा वडिलांना पांढरेदाग असतील तर मुलांना होईलच आसेही नाही .
आपल्या मुळे इतरांना पांढरे डागांचा संसर्ग होईल याची काळजी करू नका , तसे होणार नाही कारण हा सांसर्गिक किव्हा संसर्ग जन्य आजार नाही .
अंगावर पांढरे दाग का येतात ?
======================
तुमच्या त्वचेची रचना ;-
पांढरे दाग या विकारात काय होते हे जाणून घेण्यासाठी आपणास त्वचेची रचना माहिती हवी .
त्वचेला रंग हा मेलानिन् नावाच्या रंग देणाऱ्या रंग मुळे आपल्याकडे गव्हाळी अथवा सावळा रंग त्वचेला येतो , तो रंग शरीर मध्ये असणाऱ्या मेलानीन घटकावर अवलंबून आसतो .
अर्थात योग्य रीतीने त्वचेला रंग देण्यासाठी पुरेशे मेलानीन युक्त मेलानोसाईट नावाच्या पेशी आसने गरजेचे आहे . परंतु पांढरेदाग हे खालील सर्वसामान्य स्थितीत मेलानीन चे प्रमाण कमी होते व त्वचा पांढरी दिसु लागते ….
— मेलानोसाईट पेशी व्यवस्तीत कार्य करत नाहीत
— क्षमता कमी होणे .
— त्यांचा नाश होणे .
— शाररिक गुंता गुंतीच्या प्रक्रिया
— मेलानोसाईट विरोधी औषधांचा वापर जसे कि फेअरनेस क्रीम.
— यामुळे त्वचेवर पांढरे दाग दिसू लागतात .
यावरून आपणास समजले आसेल कि बाह्य उपचारांनी तुम्हाला तात्पुरते बरे वाटते आथवा काहीच बद्दल का होत नाही , बाहेरून लावलेले उपचार दीर्घ काळ आराम किव्हा आजार कायम स्वरूपी बरा करू शकत नाहीत कारण शरीरामध्येच आजाराची प्रवृत्ती असल्याने आतूनच आजार बरा होणे गरजेचे आहे , महत्वाचे आहे आणि योग्य आहे .
मेलानीन चे प्रमाण शरीरामध्ये कित्ती आहे यावर आजाराचे स्वरूप ठरते .
रुग्णांना उपचार घ्याला हवेत इतके गंभीर आहे का ?
————————————————————-
काहीजण आपल्याला पंढरेदाग हा विकार जडला आहे हे मान्य करायलाच तयार नसतात . शक्यतो ते उपचार घेण्याचे टाळतात , कदाचित या आशेवर जगतात कि हा विकार आपोआपच बारा होईल .
तुम्हाला माहिती आहे का पांढरे दाग आसल्यानंतर तुमच्या आयुष्यात काम व इतर व्यवहार करताना काही अडचण येणार नाही परंतु मानसिक व सामाजिक ताण नक्कीच जाणवेल व या मानसिक ताणामुळे झोप न लागणे व्यसनाधीनता , सततच्या ताण-तणावामुळे या गोष्टी मुले अनेक अडचणी येऊ शकतात. या गोष्टी पांढरेडागा पेक्षा मानसिक कुचंबना पांढरेदगा पेक्षाही गंभीर विकार व अत्यंत धोकादायक ठरू शकते.
जरी तुम्हाला छोटासा पांढररा दाग आसेल , फार सौम्य आसेल तरीही सुरुवाती पासून त्याचे योग्य चांगले नियंत्रण करणे आवश्यक आहे त्यावर उपचार केले नाहित किव्हा केलेले उपचार योग्य ठरत नसतील तर तो तुमच्या त्वचेला कायम स्वरुपी हानी पोहचवू शक्कतो .
टीप =
पांढरे दाग अचानक यायला वाढीस करणीभूत होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत काही जनात थोड्या गोष्टीचा परिणाम होतो आपल्या बाबतीत कोणते ‍‌कारणे करणीभूत आहेत हे ओळखण्यासाठी आकाशवाणी वरील कार्यक्रम ऐकावा .
लिंक — http://ishare.rediff.com/music/others/hallo-doctor-on-leucoderma-dr-sanjay-sonawane-mob-9822287376/2301595.”
पांढरे डागांवर रामबाण उपाय
*************************
पांढरे डागांवर रामबाण उपाय अस तुम्ही ऐकल आसेल वाचलही आसेल , या बाबतीत तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि कुटुंबियांकडून देखील सल्ला मिळेल , पण लक्षात ठेवा योग्य माहिती तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडूनच मिळेल , या उपचारांचा विचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या , कारण शास्त्रीय आधार नुसत्या दाव्यांपेक्षा अधिक सुरक्षित आहे .
कोणती औषधी मला मद्दत करतील
****************************
पांढरे डागावर योग्य उपचार म्हणजे तुमच्या लक्षणावर नाही तर पूर्ण शाररिक , मानसिक , विकारावर नियंत्रण , उपचारामध्ये काही औषधे आजारासाठी , काही प्रतीबंधानात्म्क काही शारारीसाठी पोषक प्रमाणात घ्यावी लागतात .
प्रतिबंधक औषधी
**************
ही औषधी योग्य प्रमाणात मेलानोसाईट पेशींना उत्तेजन . पुनरूत्पादन करून मेलानीन तयार करून नवीन पांढरे दाग येऊ नये म्हणून उपयुक्त ठरतात
.
पोषक द्रव्ये
काही शरीरासाठी मेलानीन तयार करण्यासाठी लागणारी पोषक द्रव्ये जसे कि काँपर , झिंक , सेलेनियम आदी जीवनसत्वे या उपचाराबरोबर दिली जातात कि जेणे करून मेलानीन लवकर व योग्य प्रमाणात तयार होईल .
पोषक द्रव्ये या उपचार पद्धतीत पांढरे डागांवर आराम मिंयासाठी वापरली जातात परंतु ते आजाराचे मुळ कारण मेलानोसील द्रव्याची कमतरता नियंत्रण करू शकत नाहीत .
टीप –
तुमच्या आजाराची तीव्रता अथवा आकारमान , तुमची अनुवंशिकता , तुमची शाररिक ठेवण यावरून डॉक्टर तुम्हाला कोणते औषध द्यायचं ते ठरवतील .
औषधी कोणती व कशी घ्यायची
पांढरे दाग ही व्याधी तुमच्या त्वचेवर परिणाम करते आजाराचे स्वरूप जरी आपणास बाह्य दिसत आसले तरी ही तुमची त्वचा ही शररिक व मानसिक विस्कळीतपनाचा आरसा आहे .
पांढरे दाग हे तुमच्या बिघडलेल्या मानसिक व शाररिक असंतुलनाचा ईशारा आहे .
पांढरे दाग ही शरीराची एक प्रवृत्ती असल्याने ती शरीराच्या आतून औषधे घेऊन जाने गरजेचे आहे .
बाह्य उपचारांनी तुमची त्वचा तात्पुरती रंग दिल्यासारखी वाटेल परंतु ते सुख क्षणिक असून त्यामुळे हे दाग आणखी जास्त ठिकाणी दिसू लागतात .
अर्थातच आजाराचे मुळकारण शरीरातून आहे तर आजार सुद्धा आतूनच बरा होणे आवश्यक आहे बाह्य उपचार हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून तात्पुरताच फरक सुद्धा तात्पुरताच दाखवतात व त्यामुळे हा आजार पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो.
परंतु ज्यावेळी पोटातून औषधी घेऊन आजार बरा होतो . त्याची पुन्हा होण्याची शक्यता जवळ-जवळ नसतेच .
टीप-
जग भरत लक्षावधी लोक या आजाराने व्यापेले आसून योग्य उपचारा अभावी यांची संख्या वाढत चालली आहे.
होमिओपॅथिक उपचार पद्धतीने डॉक्टरांनी आतापर्यंत अनेक रुग्ण कायमचे बरे केले आसून अनेक रुग्णांचे औषधोपचार चालू आहेत .
डॉक्टरांना या विषयावरील व सामाजिक केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची दिल्लीत “ चिकित्सक रत्न “या पुरस्कारासाठी निवड २००४ साली झाली.
तसेच संत रविदास प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने २४ फेब २००५ रोजी राज्यस्तरीय आदर्श् बहुजन मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
त्याच प्रमाणे १७ सेप्ट . २००६ रोजी शिव शंभो ट्रस्ट व आष्टी तालुका मित्र मंडळ अ. नगर यांचे वतीने राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कारांनी संम्मानीत करण्यात आले .
त्याच प्रमाणे युवा शक्ती सामाजिक संस्था नासिक , यांचे वतीने २० में २००८ रोजी , उप् जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड ,आ. अनिल ढिकले,आदि.च्या उपस्थितीत नासिक येथे समाज प्रबोधन २००८ पुरस्कार देण्यात आला .
तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर . यांचे वतीने शिर्डी येथे माननिय गृहमंत्री श्री, आर.आर.पाटील साहेब यांचे हस्ते कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
तसेच आत्मोन्नती विश्वशांती संस्था मुंबई यांचे वतीने मा. उपाध्याक्ष्य विधानसभा , माजी शिक्षण मंत्री श्री. वसंतराव पुरके यांचे हस्ते संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार M.I.T college pune येथे प्रदान करण्यात आला .
काही काल्पनिक गोष्टी आणि वैद्यकीय सत्य
पांढरे दाग उपचारात steroids वापरली जातात हे खरे आहे का ?
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
डॉक्टरांची उपचार पद्धत ही होमिओपँथिक आहे .आणि होमिओपँथिक उपचार पद्धतीत शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आसते ,steroids ही औषधी प्रतिकार शक्ती कमी करणारी आहेत त्यामुळे ही वापरली जातच नाहीत .
पांढरे डागांच्या उपचारांनी अंगावर फोड येतात का ?
+++++++++++++++++++++++++++++++++
वैद्यकीय सत्य –
नाही हे पूर्णता चूक आहे पोटातून औषधी घेतल्यानंतर अंगावर काही फोड येत नाहीत , पण आपण काही औषधी लावून उन्हात बसत आसल तर फोड नक्की येऊ शकतात .
होमिओपॅथिक औषधांनी आधी दाग वाढतात नंतर कमी होतात.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
हा आजाराच मुळात वाढणारा असल्यामुळे सुरुवातीला जो पर्यंत औषधी लागु होत नाही तो पर्यंत आजार अवधल्या सारखा वाटेल परंतु होमिओपॅथिक औषधांनी आधी दाग वाढतात नंतर कमी होतात हे साफ चुकीचे आहे .
माझ्यामुळे हा आजार इतरांना होऊ शकतो का ?
++++++++++++++++++++++++++++++++
हा काही संसर्ग जन्य आजार नाही त्यामुळे स्पर्शाने किव्हा इतरांचे कपडे वापरल्याने तो इतरांना होऊ शकत नाही.
मला बरे वाटल्यानंतर मी औषधी बंद केली तर चालतील का ?
तुमच्या डागांचे आकारमान अथवा दाग कमी होऊ लागल्यानंतर तुम्हाला तुमचा आजार नियंत्रणात येत आहे याची कल्पना येईल . त्यामुळे डॉक्टर तुमची औषधांची मात्रा कमी जास्त करतील परंतु काही औषधी चालू ठेवावी लागतील त्यानंतर तुम्ही पूर्ण बरे व्हाल .
बरे वाटायला लागणे म्हणजे तुम्हाला त्रास दायक लक्षणे नाहीयेत पण याचा अर्थ असा नाही कि तुमचा आजार पूर्णतः नाहीसा झाला आहे .
त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये व औषधी वेळेवर व त्यासाठी सांगितलेली पथ्ये पाळणे गरजेचे आहेत , आजार पूर्ण बारा झाल्यानंतर डॉक्टर स्वतः औषधी बंद करतील.
औषधी चालू आसताना कोणती पथ्ये पाळावीत
++++++++++++++++++++++++++++++++
आजार हा किचकट असल्याने यावर मात करण्यासाठी औषधांबरोबर काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे , काही पथ्ये न पाळणे हे आजाराची लक्षणे वाढवतात तर काही पथ्ये न पाळल्याने औषधांचा योग्य परिणाम होत नाही.
उदा. या गोष्टी टाळाव्यात..
चहा
कच्चा कांदा , लसुण , मेथी , मुळा, कोथंबीर ,
फक्त कच्चे वर्ज्य
वेलदोडे, लवंग,दालचिनी, औषधी पदार्थ .
हिंग युक्त , लोणचे
आयुवेर्दिक औषधी
जिरे मोहरीचे पदार्थ
मला सर्व सामान्य जीवन जगता येईल का ?
+++++++++++++++++++++++++++++++
हो नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेतले आणि काही पथ्ये पाळली काळजी घेतली कि झाल .
तुम्ही आत्ता पेक्षा अधिक निश्चित व मनमोकळे पणाने कुठलीही हीन भावना न ठेवता आयुष्य जगू शकता .काही पथ्ये व औषधी वेळेवर घेतली तर हा बरा ना होणारा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो .
त्रास बरा झाल्यानंतर पुन्हा होणार नाही नेहमी तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकाल व दिवसभर कार्यशील राहून तुम्ही रात्री शांत झोपही घेऊ शकता व इतराप्रमाणे आपण ही सुंदर आहोत ही भावना तुमच्यात आपोआपच जागृत होईल .
तर मग व्हा पुढे आणि आत्मविश्वासाने जीवन व्यतीत करा तुम्हा जे करायचे आहे ते करा जे आयुष्यात मिळवायचे ते मिळवा.
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
टीप –
डॉक्टरांनी दिलेली औषधी वेळेवर घेणे
पथ्ये पाळावे , योग्य आहार , योग्य व्यायाम व्यवस्तीत चालू ठेवा .
जर विशिष प्रकारची Allergy आसेल तर डॉक्टरांना तशी कल्पना द्या .
योग्य होमिओपॅथिक संशोधित औषधानी तुम्ही तुमच्या पांढऱ्या डागांवर योग्य नियंत्रण मिळवू शकता आत्ता हे सर्व तुमच्या हातात आहे .
तुमचा आजार वाढत आहे याची चिन्ह
++++++++++++++++++++++++++++
डागांचा रंग अधिकच पांढरट होत चालला आसेल .
नवीन ठिकाणी दाग दिसायला सुरुवात झाली आसेल
डागांचे आकारमान वाढत आसेल तर ….
ही आजार वाढण्याची लक्षणे आहेत
आजार बळकावत आहे आसे वाटल्यास काय करावे
+++++++++++++++++++++++++++++++++
वेळ न दवडता आपण डॉक्टरांशी संपर्क साधा .
तुम्हाला याची उत्तरे मिळाली कि मिळते ………….
सुरक्षितता
आत्म विश्वास
बंधनमुक्त जीवन
टीप –
या लेखातील माहिती असंख्य पिडीत रुग्ण आणि डॉक्टर यांच्या अनुभवावर आधारित आहे तथापि ती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय म्हणून नाही .
कोणत्याही स्वरूपाचा उपचार सुरु करण्या आधी डॉक्टरांशी संपर्क साधा ……
धन्यवाद
पुनश्च हार्दिक शुभेच्छा……
संपर्क — डॉ. संजय सोनवणे
drsonawanesd@gmail.com
hosp- 9226885194 mob- 9822287376
———————————————————————————————————————–
माझ्या एका मित्राने यावर लिहिलेला खास लेख ……….
रंगाचे अंतरंग
आपल्या आयुष्यातील वाटचालीत आपला रंगांशी खूपच जवळचा संबंध येतो. आपल्या प्रत्येक कृतीत रंग हे असतातच. कधी ते दिसतात तर कधी दिसत नाहीत. पण त्याचे असित्व आपल्याला जाणवत राहते.
तरुणपणी प्रेमात पडल्यावर गालावर गुलाबी रंग पसरतो. तर लहानपणी अभ्यास न केल्याबद्दल गुरुजींनी गालावर उमटवलेल्या पाच बोटात लाल रंग उधळतात. रागाने आपण लाल होतो ते वेगळेच. दुसर्याचा उत्कर्ष बघून आपला चेहरा काळा टिक्कर पडतो. आपल्यावर दु:खाचे प्रसंग येतात तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अंधारी येते.
रंग व आपले आयुष्य याचे जवळचे नाते आहे. वेगवेगळ्या रंगांच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी उपयोगी पडते. पण हा माझ्या लेखाचा विषय नाही.
आपण सर्वं जण रंगाशिवाय जगूच शकत नाही. बिन रंगाचे विश्व असूच शकत नाही. असो.
आज मी सफेद रंगा बद्दल बोलणार आहे. गोऱ्या रंगाचे आकर्षण बऱ्याच लोकांना असते.
सौंदर्य हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. हा शब्द समोर आला कि प्रथम आठवते ती जाहिरात किवा ती स्री. सौंदर्य वाढविण्याच्या जाहिरातींचा रतीब TV वर चालू असतो. केसांचे सौंदर्य, त्वचेचे सौंदर्य, चेहर्याचे सौंदर्य, डोळ्यांचे सौंदर्य, दातांचे सौंदर्य असे बरेच प्रकार ह्या जाहिरातीत असतात. प्रत्येक वेळी एखादी सुंदर स्री, ती जाहिरात करत असते.
सौंदर्य निरखायचे असेल तर आरसा हवाच. Beauty is not what your see in the mirror,. सौंदर्य म्हणजे नितांत गोरी त्वचा नव्हे. मला अपेक्षित आहे ते मनाचे सौंदर्य, निसर्गाचे सौंदर्य, वर्तणुकीचे सौंदर्य, विचारांचे सौंदर्य, श्रमांचे सौंदर्य इत्यादी. हि वेगवेगळी सौंदर्य स्थळे शोधण्यासाठी आपली जडण घडण तशी असणे आवश्यक आहे.आपल्यावर कसे संस्कार केले जातील हे कदाचित आपल्या हातात नसेल. पण शिक्षणाने , अनुभवाने, चुकीचे संस्कार आपण पुसू शकतो. ती सौंदर्यदृष्टी आपल्याला चांगला माणूस बनण्यासाठी मिळवावीच लागेल.
काय पटतोय का माझा विचार? मला कोणाला दोष देयचा नाहीये. आपण जेव्हा कोणाला भेटतो तेव्हा आपण खरेतर त्या माणसाच्या शरीराला भेटत असतो. आपल्या मनात त्याच्या दिसण्यावरून ‘ग्रह’ तयार झालेले असतात व आपण सहजपणे त्या माणसाची वर्गवारी करून मोकळे होतो. खरेतर समोरचा माणूस हि आपल्याला भेटल्यावर हेच करत असतो. परंतु आपण जेह्वा त्या माणसाला वारंवार भेटतो, तेव्हा आपले लक्ष शारीरिक गोष्टी वरून वैचारिक बैठकीकडे वळते. अधिक विवेचनासाठी माझा लेख ‘सौंदर्य’ वाचवा . लिंक: http://bit.ly/i6ZCHn
एवढ्या प्रस्तावानेनंतर आता मुख्य विषयाला सुरवात करतो. गोऱ्या त्वचेचे आपल्याला आकर्षण असते. पण जेव्हा एखाद्याच्या तोंडावर, शरीरावर आपल्याला लहान, मोठा पांढरा डाग दिसतो, तेव्हा मात्र आपण त्या माणसाला टाळतो किवा काही तरी बोलून त्याचे वैगुण्य दाखवितो. खरेतर तो माणूस आधीच काळजीत असतो. तो पण माणसांना टाळायचा प्रयत्न करत असतो. मनाने खचलेला असतो. ह्याचा विचार न करता आपण मात्र त्याला दुखवित असतो.
मित्रानो कृपा करून असे करू नका.
ह्या रोगाचे नाव आहे — सफेद डाग, श्वेत कुष्ट. इंग्लिश मध्ये ह्या रोगाला Leucoderma or Vitilago असे म्हणतात.प्रत्यक्षात कुष्ट रोगाशी ह्याचा अकारण संबंध जोडला जातो. माणसाचा रंग त्वचेतील Melanin या द्रव्यां वर अवलंबून असते. ह्या Melanin चे प्रमाण शरीरातील एका भागातील खूप कमी झाले तर तो भाग पांढरा दिसतो. बरेच वेळा पोटातील जंता मुळे सुद्धा हा पांढरा डाग येतो.
हा रोग नियमित औषधाने बारा होतो. हा रोग पूर्ण पणे अनुवांशिक नाही , तसेच सांसर्गिकही नाही.
मित्रानो, प्रत्येक माणसात देवाने काहीना काही व्यंग निर्माण केलेले असते. काही व्यंग दिसतात तर काही दिसत नाहीत. म्हणजे ती व्यंगे नसतात असा अर्थ होत नाही. म्हणूनच मी तुम्हाला तुमची सौंदर्य दृष्टी सुधारण्यासाठी माझा लेखसौंदर्य वाचायची परत एकदा विनंती करत आहे. जमल तर अश्या माणसाला मदत करा पण त्याचे वैगुण्य दाखून त्याला दुखाऊ नका.
मित्रानो कराल ना एवढे?
सुधीर वैद्य
_________________
Dr. SANJAY D SONAWANE
Dispense Date : 09/09/2011
_____________________________________________________________________________________
Clinic Add. : ANAND HOSPITAL AND RESEARCH CENTRE, GHODEGAON . TAL- NEWASA DIST – AHMEDNAGAR , GHODEGAON, 414607
Res. Add. : ,
Clinic :9226885194 Mobile : 9822287376
Email : drsonawane@rediffmail.com

Saturday, August 13, 2016

[10:42 PM, 8/12/2016] +91 97623 78492: डेंगू आणि होमिओपॅथीक उपचार आणि प्रतीबंध

साला एक मच्छर .....

एवढे म्हटले कि नानापाटेकर आठवतंय ना .. मला वाटते क्रांतीवीर मधला संवाद आसावा .. डासांचा पराक्रम तसा खुप मोठ्ठा आहे , कसाब पासुन सर्व सामान्यांपर्यंत सर्व त्रस्त ...

पाच सहा वर्षानन्तर अनेक ठिकाणी झालेला अमाप पाऊस काही ठिकाणचा दुष्काळ आणि त्यातच आवध्या महाराष्ट्रभर चालु असलेली डेंगू आजाराची लागण आणि वाढता प्रभाव यामुळे सर्वत्र चिंतेचा आणि चर्चेचा विषय ..

मुम्बई आणि राज्यात रोज नवीन निदान होणारे डेंगूचे रुग्ण याने आरोग्य प्रशासन आणि प्रशासन ,आरोग्य व्यवस्था उपचार करतांना डॉक्टरांना येणाऱ्या आडी- अडचणी व डॉक्टरांची होणारी त्रेधातिरपट पाहून नाना पाटेकरच्या चित्रपटाच्या संवादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही ...`` साला एक मच्छर ......

साला एक मच्छर आदमी को .....

एडीस इजिप्ती या एका प्रकारच्या डासांनी आक्षरश: धुमाकूळ घातला आहे

पहिल्यांदा चिकुन गुनिया आणि आत्ता डेंगू ने दहशत निर्माण केली आहे .

डेंगू हा एडीस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत फैलावला जाणारा आजार आहे .हा सर्व साधारण पणे उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळतो डेंगू विषाणू हा अर्बो व्हायरस (Arbo Virus ) या प्रकारातील आहे .त्याचे पुन्हा काही उपप्रकार पडतात . जसे कि D1,D2,D3,D4 .

डेंगूचा संसर्ग झाल्यांनतर त्याचे साधारणतः दोन प्रकार पडतात

१) लक्षाणा विरहित डेंगू

२) लक्षणा सहित डेंगू

लक्षणा विरहीत डेंगू :---

या प्रकारात जरी एखाद्या व्यक्तीला याचा संसर्ग आणि लागण जरी झाली तरीही तो निरोगी व कुठल्याही प्रकारची लक्षणे नसतात .

लक्षणासहित डेंगू :--

या मध्ये प्रामुख्याने ३ प्रकार पडतात ..

१) सर्व लक्षणासहित डेंगू चा ताप .. ( Classical Dengue Fever )

२) रक्तस्राव होऊन रक्तदाब कमी करणारा ( शॉक) डेंगू चा ताप ( Dengue Haemorrhagic Fever )

३) रक्तस्राव होऊन रक्तदाब कमी न करणारा ( Dengue Without Shock )

डेंगू चा प्रसार :-

एडीस इजिप्ती या एका प्रकारच्या डासांच्या मार्फत या डेंगू आजाराच्या विषाणूंचा प्रसार होतो . हा डास सर्व साधारण डासापेक्षा मोठ्ठा काळा व त्याच्या अंगावर पांढरे वाघासारखे चट्टे आसतात त्यामुळे त्याला टायगर मोस्कुटो ( Tiger Mosquito ) म्हणूनही संबोधले जाते .

साधरणपणे हा डास दिवसा चावतो .

त्याही उत्पत्ती साधारण पणे साठवलेल्या गोड्या पाण्यातच होते .

उदा:- जुन्या टायर मध्ये साचलेल्या पाण्यात . नारळाच्या करवंट्या ,फुलदाणी , फिश टंक ( Fish Tank ) झाडांच्या डोलीत असणाऱ्या पाण्यामध्ये .

डेंगू चा ताप :-

डेंगू च्या तापेला ( Break Bone Fever ) हाडे मोडणारा ताप असाही उल्लेख केला जातो, या आजारामध्ये रुग्णाला असह्य तीव्र हाडांच्या , सांध्यांच्या वेदनेमुळे याला हाडे मोडणारा ताप आस हि उल्लेख केला जातो , आणि विशेष म्हणजे हाच डास चिकुन गुनियाही फैलावतो त्यामुळे बराच वेळा दोन्ही हि त्रास बरोबर आसू शकतात .

डेंगू ची लक्षणे :-

१) अचानक थंडी वाजुन तीव्र ताप , ताप सर्व साधारण पणे १०२ ते १०५ f. आसू शकते

२) तीव्र स्वरुपाची डोके दुखी:- या मध्ये डोळ्याच्या खोबणीमागे , बुबुळामागे तीव्र स्वरूपाच्या असह्य वेदना

३) तीव्र स्वरुपाची अंगदुखी व आस्तीदाह्

४) अशक्त पणा , मळमळ , भूक न लागणे . उलट्या ,पोटदुखी

५) घशाला कोरड पडणे , बद्धकोष्ठता

६) डोळे लाल होणे ,, चेहरुयावर सुज येणे

७) आजार बळावल्यास कवीळ , पोटदुखी, रक्तस्राव इत्यादी

रक्तस्राव होणारा डेंगू चा ताप ( DHF) :-

जेव्हा डेंगू आजार बळावला जातो व ज्यावेळी डेंगू एकापेक्षा जास्त दोन प्रकारच्या डेंगूच्या विषाणूमुळे डेंगू होतो त्यावेळी संवेदन शील प्रतिकारशक्ती मुळे ----

· अचानक जास्त प्रमाणात ताप येऊन तो २ ते ७ दिवस राहू शकतो

· यकृतावर सुझ येऊन त्याची वाढ व तीव्र पोटदुखी , कळ येणे

· तीव्र स्वरुपाची अंगदुखी व सांधेदुखी

· रक्तस्राव प्रामुख्याने

- त्वचेखाली रक्तस्र्ताव होऊन त्वचा निळी काळी . लाल दिसणे

- ( Patechial Haemorrhage )

- अंगावर लालसर पुरळ

- नाकातून रक्तस्राव ( Epitaxis)

- हिरड्या मधून रक्तस्राव ( Bleeding Gums )

- संडास मधून रक्तस्राव ( Malena )

- लघवी द्वारे रक्तस्राव ( Haematuria )

प्रयोगशाळेतील काही चाचण्या :-

- रक्तातील डेंगू च्या Antibodies test – IGM AND IGG

- रक्तातील पांढऱ्या पेशी आणि रक्त गोठवणाऱ्या कोशिकांची तपासणी

( complet haemogram , Leucocyte and Platlet count )

होमिओपॅथिक उपचार व प्रतिबंध :-

होमिओपॅथिक उपचार पद्धतीने रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवुन डेंगू चा उपचार आणि प्रतिबंध करणे सहज शक्य आहे .

कुठलाही दुषपरिनाम न होता ( By Immunomodulation of patient with out any side effect & adverse effect )

होमिओपॅथिक औषधांची निवड रुग्णांची प्रतिकार शक्ती , विषाणूंची बधाक्कता व रुग्णांची लक्षणे यावर आधारित व अवलंबून आसतात .

होमिओपॅथिक उपचार पद्धती हि निसर्गाच्या नैसर्गिक नियमावर आधारित आसून पूर्णता:शास्त्रीय आहे .

“ सम सम: सामायन्ति ” (Similia Similibus Curanter) या तत्वा वर आधारित आहे .

होमिओपॅथिक औषधी रुग्णाची शाररिक , मानसिक ,प्रतिकार शक्ती वाढवतात .त्यामुळे विषाणूचा जरी संपर्क किव्हा संसर्ग झाला तरी फारसा त्रास जाणवत नाही .

होमिओपॅथी मध्ये डेंगू साठी कमीत कमी २५-३० पेक्षाही जास्त औषधी उपलब्ध आसून त्यांच्या मध्ये आजार बारा करण्याची व प्रतिबंध करण्याची क्षमता आहे . हे मागे भारतात व भारत बाहेरील देशामध्ये सिद्ध झालेले आहे .

हि औषधी पूर्णता: सुरक्षित व दुष्परिणाम विरहीत आहेत .हि औषधी कुठल्याही वायो गटातील व्यक्ती तसेच गरोधर स्रीया हि घेऊ शकतात. योग्य उपचार अधिकृत डॉक्टरांकडूनच घेणे आवश्यक योग्य आणि हितावह आहे .

अलीकडे औषधांची नावे डॉक्टरांकडून घेऊन घरच्या घरी उपचार करणाऱ्या मंडळींची संख्या रोडावत आहे ,हि प्रवृत्ती आरोग्यास घतक आहे .त्यामुळे या लेखात मुद्धामच औषधांची नावे टाळत आहे .

प्रतिबंध :-..

या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी :--

१) सामाजिक जागरूकता:

२) डासांचा प्रतिबंध

सामाजिक जागरूकता: :-

१) Prevention is always better than cure आजार झाल्या नंतर उपचार करून बरे होण्यापेक्षाही आजार होऊच नये हि खबरदारी खुप महत्वाची आहे , नुकतेच आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी साहेबांनी हि स्वछेते बद्दल खुप छान संदेश दिला आहे आपण हि सर्व जन मिळून आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेऊ या आणि आजार दूर ठेऊ यात..

२) या आजारामध्ये बऱ्याच वेळा रक्त गोठवणाऱ्या कोशिका

(platlets ) कमी होतात त्यामुळे रुग्णांना रक्त आथवा Pletlets

देण्याची बऱ्याचवेळा गरज पडते . तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान करणेही गरजेचे एक सामाजिक जबाबदारी म्हणून स्वेच्छेने रक्तदान करावे .

प्रतिबंध :-

विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून डासांची उत्पती स्थाने नष्ट करावीत अथवा चावाण्यापासून प्रतिबंध करणे

· पाण्याच्या टाक्या कंटेनर यावर झाकणे टाकणे , वरच्यावर साफ करणे

· कोरडा दिवस पाळणे

· मच्छर दानी , डास विरोधार आगरबत्ती , मलम वापरणे

· डास विरोधी औषधांची फवारणी

ताप आल्यानन्तर लवकरात लवकर अधिकृत डॉक्टरांशी संपर्क साधावा मनाने औषधी घेणे शक्यतो टाळावेत

आजाराविषयी भीती :-

ढोबळ मनाने लेख वाचून / आजाराची माहिती घेतल्यास विशेष आसे काही जाणवत नाही परंतु (DHF ) रक्तस्राव होणारा डेंगू चा ताप हा सर्वात धोकेदायक आजार आहे. यामध्ये नाकातून ,तोंडातून ,लघवीवाटे ,संडास वाटे ,राक्तस्राव होऊन रुग्ण बेशुध्द होण्याचे प्रमाण अधिक आहे व रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आसते . हीच एक चिंताजनक आणि धोके दायक बाब आहे . वरील पैकी कुठलीही लक्षणे आढळ्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या व गरज पडल्यास रुग्णलयात दाखल करावे ..⁠⁠
dr sanjay sonawane www.drsanjaypatil.blogspot.in  mob 9822287376⁠

Friday, June 24, 2016


आवघ्या तरुणायीला नाचवले तुवा सैराट
पण कोडापुढे झाला होता बुवा तु तर्राट
ब्रेंक डान्स ने केलेस रेकॉर्ड ब्रेंक
पण कोडाने लावला तुझ्या जीवनाला ब्रेंक
होऊ नये ते होऊन गेले , २५ जूनला तु सोडून गेलास
तुझ्याच स्मरणार्थ रंगाचा दिवस हि पाळला गेला
आज होऊन तुझे स्मरण , टाळूयात आनेकाचे सरण
आवघ्या ब्लाक अंड व्हाईट , डेंजरस वर व्यथा तु मांडून गेलास
करूया संकल्प आज कोड्ग्रस्तांना देऊया आज
मद्दतीचा हात आणि सामाजिक साथ .....
धन्यवाद मित्रांनो `
सदैव तुमचाच ... डॉ. संजय ९८२२२८७३७६

Monday, June 6, 2016

लागला ओ पुन्हा एकदा एका मुलीचा संसार सुखाला ..... नांदा सौख्यभरे

लागला ओ पुन्हा एकदा एका मुलीचा संसार सुखाला ..... नांदा सौख्यभरे ....
कोड , पांढरे दाग
   
होली है भाई होली है बुरा ना मानो होली है ... होली रंगोंका त्योहार है ... अगर ये रंग ना हो तो कैसी बेरंग लगेगी ये दुनिया ...... हा शोले मधील संवाद जीवनात खरंच कसा लागु पडतो नाही का ?
खरंच रंगाचा आयुष्याशी कित्ती जवळचा संमध येतो काही उत्सव आसो वा वास्तविक जीवन खरंच जीवनात रंगच नसेल तर जीवन अवघे बेरंगच होऊन जाते सारे आयुष्य नाही का ?
आयुष्याच्या वाटचालीत रंगाचा आणि आपला
पावालोगणित समंध येतो जसे की प्रत्येक कृती मध्ये विविध रंगाच्या
छट्टा उसळतात काही जाणवतात तर काही अनुभवावे लागते . पण त्याचे आस्तित्व आपल्याला जाणवत राहतेच ...
तरुणपणी प्रेमात पडल्यावर गुलाबी रंग ,लहानपणी आभ्यास न् केल्याबद्दल गुरुजींनी गालावर उमठवलेल्या पाच बोटांचा लाल रंग, इच्छित हट्ट वडिलांनी पुरवल्यानंतर फुलणारे चेहऱ्या वरील हास्याचे रंग ,राग आल्यानंतर लाल बुंध होणारा चेहरा, अपमानाने काळानिळा होणारा चेहरा , दुसऱ्याची प्रगती पाहून काळा ठक्कर पडणारा चेहरा , दुखद प्रसंगी डोळ्या समोर येणारा काळा कुट्ट अंधार ...... इत्यादि .
खरंच कित्ती रंगांचा व्याप्ती आहे आपल्या भावनिक , वैवाहिक, सामाजिक जीवनामध्ये . रंग आणि आयुष्य यांचे जवळचे नाते आहे. खरंच रंगाशिवाय जीवनात रंगच उरत नाही ना ? रंग शिवाय आयुष्य खरंच बेरंगच होऊन जाते ,
जेव्हा आयुष्यातील रंग निघून जातो त्यावेळी मनुष्य मानसिक दुष्ट्या कित्ती कित्ती हतबल होतो नाही का ? आज आपण आशाच एका शाररिक आजाराबद्दल चर्चा करणार आहोत की ज्यामध्ये शरीरात आसनारी रंग द्रव्ये हळू हळू कमी होत जातात आणि त्यामध्ये पांढरेपणा दिसू लागतो ....... आणि खरंच आयुष्य बेरंग होऊ लागते होय , मी पांढरे दाग , कोड , leucoderma , vitiligo विषयीच बोलत आहे .
गोऱ्या रंगाचे आकर्षण तर सर्वांनाच आसते , पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लहान मोठ्ठा पांढरादाग दिसू लागतो त्यावेळी मात्र आपण त्याला टाळतो , त्याचे वैगुण्य त्याला दाखवतो ,कळत न् कळत आपण त्याला दुखावतो , खरे तर ती व्यक्ती आधीच काळजीत आणि दुखात आसते पण आपण विचार न करता दुखावत आसतो ,तो पाहिलाच मनाने खचलेला आसतो आशा व्यक्तींना खरे तर मानसिक सामाजिक आधाराची गरज आसते , पण आसे होत नाही त्यांना आधार देण्याऐवजी दुखावले जाते ही खेदाची बाब आहे, कृपा करून आसे करू नका ..
मित्रांनो प्रत्येक माणसात काही ना काही व्यंग , कमतरता असतेच काही दिसतात तर काही दिसत नाहीत , त्यामुळे आशा व्यक्तींना जमले तर सहकार्य करा त्यांचे वैगुण्य दाखवुन त्यांना दुखवू नका ...
जागतिक vitiligo Research Foundation समितीने कोड विषयी असणाऱ्या गैरसमजुती दूर करून समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी २५ जून हा जागतिक कोड दिन म्हणुन पाळावयाचे ठरवले आहे . या दिवशी विविध सामाजिक संघटना या दिवशी विविध जनजागृती पर योजना कार्यक्रम राबवतात किबहुना त्याचे अविरत कार्यक्रम चालूच आसतात . कोड. पांढरे दाग . leucoderma , vitiigo या नावाने वैद्यकीय शास्त्रात संबोधले जाते तसा हा काही मोठ्ठा शाररिक आजार नाही पण एक मोठ्ठी सामाजिक समस्या आहे . विशेषतः मुलीमध्ये त्यातच उपवर मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये सुद्धा विवाह जुळण्यास फार मोठ्ठी आडचण आहे ,त्या शिवाय ज्या व्यक्तीना पंढरेदाग कोड या आजाराने त्रास आहेत त्या समाजापासून दूर उपेक्षित राहतात. या लोकांमध्ये एकेल कोंडेपना , शापित आयुष्य व्यतीत करतात .
कोडावर, पांढरे डागांवर कुठलेही औषधी नाही , हा दैवी कोप आहे वगैरे समजुतीही आपणाकडे रूढ आहेत .
पांढरेदाग कोड .Leucoderma , Vitiligo म्हणजे काय , तो कसा होतो ,अनुवांशिक आहे का ? यावर उपचार करायला हवेत इतके गंभीर आजार आहे का ? या आणि आशा अनेक नानाविध प्रश्नानी रुग्न गोंधळला जातो काय करावे आणि काय नाही यातून तो पूर्ण गोंधळला जातो . आशावेळी रुग्नानाची कोंडी होते काय करावे हेच सुचत नही , अनेक उपचार करून ही फरक न झाल्यामुळे आगदी सुशीक्षीत रुग्ण सुद्धा अंधश्रधेला बळी पडतात आणि शेवटी निराशाच वाट्याला येते आणी शेवटी निराशाच पदरी पडते. ...
या सर्व प्रश्नांची उक्कल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत
या आणि आशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आमच्या कडे आहेत आणि आम्ही ह्या लेखाच्या आधारे तुम्हाला देत आहोत.
हा लेख तुम्हा;ला काही मुलभूत गोष्टींची माहिती देईल , तसेच रुग्णावर सहज सुरक्षित आणि परिणाम कारक इलाज कसे होऊ शकतील. हे आपणास सांगेल .
इतकच नाही तर याचा हेतू आहे रुग्णांना निरोगी कार्यशील जीवन जगता येणे शक्य आहे असा विश्वास देण्याचा , तुम्ही पांढरे डागांवर सहज विजय मिळवू शकता , तुम्हाला वाटते त्याहूनही अधिक ते सोप्पे आहे ते ..
टीप -- सकारात्मक विचार करा पण त्याच बरोबर पांढरे दाग हा गंभीर आजार आहे. याची ही जाणीव ठेवा , त्यावर उपचार केलेच नाही किव्हा केलेले उपचार योग्य नसतील तर ते धोक्कादायक ठरू शकतो .
कोड विषयी समज गैर समज
++++++++++++++++++++
वैद्यकीय दृष्ट्या कोड हा काही आजार नाही . कारण यापासून कुठलाही त्रास होत नाही किव्हा जीविताला ही काही धोका नाही तरी सुद्धा कोड हा भयंकर सामाजिक आजार आहे .पांढरेदाग असलेल्या मुला-मुलींचे लग्न होणे कित्ती आवघड आसते हे त्या कुटुंबाच ज्ञात आसते .त्या कुटुंबावर कलंक लावला जातो समाजात त्यांची आवहेलना केली जाते ज्या व्यक्तीला कोड आहे, त्या व्यक्तीला आपल्यात काहीतरी कमतरता आहे , आपणास काहीतरी असाध्य भयानक आजार झाला आहे. या न्युनगंडात तों वावरत आसतो . किबहुना तो समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आसतो .त्याचा आत्मविश्वास पूर्णपने धसाळलेला आसतो.हे सर्व सर्व विसरून जर त्याने समाजात कर्तुत्व करून दाखवले तर समाज त्यांना मानवंदना देतो अशी अनेक उदाहरणे आहेत. उदा. मायकल जाक्सन , भारताचा वीख्यात क्रिकेट पट्टू एकनाथ सोनकर याने तर विश्वविक्रम घडून दाखवला .
भारतीय समाजात अनेक गैरसमजुती आहेत . समाजातील काही भोंदू बाबा , देवालाशी, मंत्रीक तांत्रिक कोड आसलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांना याबाबद वाट्टेल ते सांगतात , कुलदेवतेचा किव्हा अन्यदेवाचा कोप ,त्यामुळे हे संकट कोसळल्याची भीती घालतात त्यामुळे अनेक धार्मिक विधी , उपवास , व्रत वैकल्ये , मंत्र तंत्र आणि धार्मिक विधी उपचारामुळे कोड बरा होईल असा सल्लाही देतात त्यासाठी प्रचंड पैसा ही उकतात . काही झाडपाल्यावाले वैदू , तुमडी , जळवा आदी अघोरी उपचार ही करतात तसेच काही झाड पाल्याची औषधी ही देतात याचाही काहीही उपयोग होत नाही . कोडवर योग्य वैद्यकीय उपचार करून घेणेच योग्य आहे , ग्रामीण भागात तर कोडच्या , पांढरे डागाच्या बाबतीत खुपच गैरसमज आहेत. यासाठी सामाजिक प्रबोधन फार महत्वाचे व गरजेचे आहे , प्रबोधन करून त्यांना सामान्य
जन-प्रवाहात आणणे गरजेचे आहे .कोड बाधित व्यक्तींना आपल्याला काहीतरी असाध्य आजार झाला आहे असा मनोगंड आसतो, त्याचे त्यांना योग्य शास्त्रीय मार्गदर्शन व कारण समजावून सांगून मनोगंड दूर करणे करणे इष्ट आहे .
मुलींच्या बाबतीत पांढरे डागांचा , कोडचा त्रास खूप जाणवतो आशा मुलींचे विवाह जमने खुपच आवघड जाते, काही वेळा तर पूर्वजांनी केलेल्या पापांमुळे या पिढीत हा रोग आल्याचा अपप्रचारही समाजात केला जातो, आशा मुलींचे आयुष्यही बरबाद झाल्याची उदाहरणे समाजात आहेत . बऱ्याच वेळा उतार वयात ही लक्षणे दिसू लागतात परंतु योग्य उपचार घेते की हा असाध्य आजार असाध्य नाही .
मंगळी मुलगी तशीच कोडची मुलगी कुटुंबाला शाप ? आसा आक्रोश करूनही काही उपयोग नाही , मांत्रिक तांत्रिक कडे जाऊन ही काही फारसा उपयोग नाही. ज्या व्यक्तींना कोड आहेत त्या व्यक्ती शापित आहेत किव्हा काही वेगळया आहेत असा समज करून घेऊ नये ,या आजाराने शाररिक , बौद्धिक , मानसिक क्षमतेवर कुठलही परिणाम होत नाही. त्यांची बुद्धीमत्ता ही अन्य व्यक्तीप्रमानेच आसते . भारतीय समाजात कोड म्हणजे महाभयंकर आजार आहे, हा गैरसमज आंध्रश्रद्धा रुढी परंपरेतून कायम राहिली आहे.ही बाब दुर्दैवी बाब आहे. आगदी सुशीक्षित माणसेही गंडेदोरे आणी अंगारा-धुपार्याचा मार्ग या कोड निवारण्यासाठी स्वीकारतात हे मी पाहिले आहे, हे योग्य नाही कोड असणाऱ्या व्यक्तींनी समाजात अनेक उतुंग यशाची शिखरे गाठली आहेत .हे लक्षात घेऊन आपण सर्वजन मिळून या कोडची कीड दूर करू या ....
त्वचेवर बऱ्याच प्रकारचे पांढरट किव्हा पांढरे दाग येतात सर्व पांढरे दाग म्हणजे कोड अथवा पांढरेदाग आसू शकत नाहीत बऱ्याच वेळा अनेक आजारामध्ये जसे की पितीरीयासीस अल्बा
( pitiriasis Alba ) पोस्ट इंफ्लामेटरी (post inflamatory )
हय्पोपिग्मेंतातैओन ( hypopigmentation ) , ईदिओ पथिक हायपो पिग्मेंतातीओन ( Idiopathic Hypopigmentation ) भाजल्या नंतर जन्मजात , नँवस , पांढरे दाग यात समाविष्ट होतात . पांढरे दाग आहेत की बाकी काही याचे निदान तज्ञ डॉक्टर कडूनच करून घेणे योग्य आहे .
कोड म्हणजे काय ?
===============
आगदी सोप्प्या भाषेत सांगायचे ठरले तर शरीरात असणारा रंग
कमी झाल्याने त्वचा पांढरी दिसू लागते,यालाच पांढरे दाग म्हणतात
त्वचे मध्ये असणारया मेलानीन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणामुळे शरीरास काळा , सावळा. निम गोरा , गोरा रंग येतो . तो रंग तयार करणाऱ्या पेशी ज्यावेळी अकार्याक्षम होतात, व्यवस्तीत कार्य करत नाहीत, आथवा नष्ट होऊ लागतात त्यावेळी त्वचा पांढरट होते आणि पांढरे दाग दिसू लागतात .
पांढऱ्या डागांचे विशेषतः प्रमाणानुसार चार प्रकार पडतात
======================================
१) लोकालईझड – यामध्ये एकाच ठिकाणी दाग येतात आणि स्थिर असतात
२) सेग मेंटल -- एका पट्ट्या मध्येच येतात .. दोन्ही बाजुं सारखेच असतात
३) अक्रोफेसिअल – या मध्ये शारीरच्या टोकाच्या भागाकडे हे दाग असतात म्हणजे हाताच्या बोटांकडे, ओठांवर , तळहात , टाळ पाय , आशा ठिकाणी आसतात
४) जनरल -- पूर्ण शरीरावर आसतात ..

कोडचे कारण
+++++++++
एखाद्याला कोड का होतो हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे . कोडमध्ये जंतू विषाणू नसतात. कोड कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो ,हा काही दैव दैवतांचा शाप नाही की भूतबाधा ही नाही...
याला शास्त्रीय कारण एवढेच सांगता येईल की मेलानीन हा रंग तयार करणाऱ्या मेलानोसाईट पेशींच्या विरोधात एँनटी मेलानोसाईट प्रतीद्रव्ये तयार होतात आणि ही प्रती द्रव्ये मेलानीन निष्क्रीय करतात व मेलानीन तयार होत नाही ही प्रतीद्रव्ये का तयार होतात हा संशोधनाचा विषय आहे . आणि त्याविषयी जगभरात संशोधन चालू आहे
आपल्याच शरीराती काही पेशी आपलीच ओळख विसरतात आणि अनोळखी पेशींना नष्ट करण्याची प्रक्रिया चालू होते आनि तेथूनच हा आजार बळावतो ...
गेल्या १४ वर्षांपासून मी या विषयावर आभ्यास करत आहे आणि बयाच श्या गोष्टी अनुभवातून समोर येत आहेत .
कोडावरील उपचाराचे यश अपयश
+++++++++++++++++++++++++
१) एकाच घरात दोन पेक्षा जास्त व्याकीनांना ही बाधा आसेल तर वेळ लागतो
२) बऱ्याच वर्षांपासून जुनाट झालेल्या आजाराला वेळ आगतो
३) पांढरे दगनावर काले केस असल्यास लवकर फरक पडतो
४) अंगावर जास्त प्रमाणात असल्यास वेळ लागतो
५) वयाच्या ४० वर्षांनतर उशिरा फरक पडतो
६) उपचारासाठी काही महिने वर्ष हा कालावधी आतो त्यामुळे रुग्ण बरोबरच डॉक्टरांनी ही संयम पाळणे हे गरजेचे आसते ...

अधिक माहिती साठी आपण आकाशवाणी वरील हल्लो डॉक्टर, हा कार्यक्रम ऐकावा.
सामाजिक उपक्रम
+++++++++
आशा रुग्णांना उपचार सोबतच योग्य वैद्यकीय मार्गदर्शन तसेच सल्ला , उपचार मिअने आवशक आहे .
आम्ही कै. शंकरराव पाटील सोनवणे वैद्यकीय सामाजिक प्रतीश्तन व आनंद हॉस्पिटल अन्ड रिसर्च सेंटर यांचुया विद्यमाने सुंदर मी होणार ही माहिती पूर्ण चित्र फीत २००३ साली प्रकाशित केली आहे , तसेच इंटरनेट वर त्या विषयी सुंदर मी होणार हे पेज तसेच www.cureleucoderma.blogspot.com तसेचwww.drsanjaypatil.blogspot.com या संकेत स्थळावर विस्तृत माहिती दिली आहे ..
चला तर उपेक्षितांना आधार देऊन आपण ही म्हनु या ज्योत से ज्योत जगते ते चलो प्रेम की गंगा बहाते चलो.....
जग भरात लक्षावधी लोक या आजाराने व्यापेले आसून योग्य उपचारा अभावी यांची संख्या वाढत चालली आहे.
होमिओपॅथिक उपचार पद्धतीने डॉक्टरांनी आतापर्यंत अनेक रुग्ण कायमचे बरे केले आसून अनेक रुग्णांचे औषधोपचार चालू आहेत .
डॉक्टरांना या विषयावरील व सामाजिक केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची दिल्लीत `` चिकित्सक रत्न ``या पुरस्कारासाठी निवड २००४ साली झाली.
तसेच संत रविदास प्रतिष्ठान अहमदनगर यांचे वतीने २४ फेब २००५ रोजी राज्यस्तरीय आदर्श् बहुजन मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
त्याच प्रमाणे १७ सेप्ट . २००६ रोजी शिव शंभो ट्रस्ट व आष्टी तालुका मित्र मंडळ अ. नगर यांचे वतीने राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कारांनी संम्मानीत करण्यात आले .
त्याच प्रमाणे युवा शक्ती सामाजिक संस्था नासिक , यांचे वतीने २० में २००८ रोजी , उप् जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड ,आ. अनिल ढिकले,आदि.च्या उपस्थितीत नासिक येथे समाज प्रबोधन २००८ पुरस्कार देण्यात आला .
तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर . यांचे वतीने शिर्डी येथे माननिय गृहमंत्री श्री, आर.आर.पाटील साहेब यांचे हस्ते कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
तसेच आत्मोन्नती विश्वशांती संस्था मुंबई यांचे वतीने मा. उपाध्याक्ष्य विधानसभा , माजी शिक्षण मंत्री श्री. वसंतराव पुरके यांचे हस्ते संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार M.I.T college pune येथे प्रदान करण्यात आला .
त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) ,
पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र )
संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.