सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Wednesday, April 11, 2018


ABP MAZA

http://abpmajha.abplive.in/blog/blog-on-founder-of-homeopathy-christian-fridrich-samuel-hahnemann

Image may contain: 2 people

10 एप्रिल हा दिवस वैद्यकीय क्षेत्रातल्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. दि. 10 एप्रिल 1755 या दिवशी ख्रिस्तिअन गोत्फ्रिएड हॅह्नेमॅन (Christian Gottfried Hahnemann ) यांच्याकडे एक बालकाचा जन्म झाला या बालकाने ख्रिस्तिअन फ्रेड्रिक सम्युअल हॅह्नेमॅन (Christian Fridrich Samuel Hahnemann ) पुढे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती करून होमिओपथि या वैद्यकीय शाखेचा शोध लावून संशोधन करुन मानवतेच्या हितासाठी व आजारी रुग्णासाठी आयुष्य वेचलं. त्यांनी आयुष्यामध्ये अनेक अडचणीचा सामना करत आपल्या निश्चयावर ठाम राहून या वैद्यकीय शाखेचे महत्त्व पटवून दिले.

 

ख्रिस्तिअन फ्रेड्रिक सम्युअल हॅह्नेमॅन यांचा अल्पपरिचय

सुरुवातीला घराची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना बालपणी शाळा शिकता आली नाही. आई-वडिलांनी त्यांना घरीच लिहिणे वाचणे शिकवले, त्यानंतर 20 जुले 1767 मध्ये त्यांच्या गावातल्याच प्रिन्स स्कूलमध्ये जावू लागले. त्यांची हुशारी पाहून सर्वजण त्यांना जीव लावत असत, त्यांचे मुल्लर (Dr . muller) नावाचे शिक्षक तर त्यांचा मुलाप्रमाणे सांभाळ करत.

वेळप्रसंगी त्याची शाळेची फी सुद्धा ते स्वत: भरत असत. वयाच्या 20 व्या वर्षी पुढील अभ्यासासाठी लेप्सिक (Leipsic) मध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी रवानगी झाली. परिस्थितीने व वडिलांनी त्यांना एक शिकवण दिली होती, की सर्व गोष्टी अनुभवूनच अंगिकार व चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात करा . त्यानंतर त्यांनी Verna मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व MD पदवी मिळवली.

वैद्यकीय सेवा (1779- 1792)

या दरम्यानच्या काळात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवला पण त्यात त्यांचे मन रमेना, कारण त्यांच्या लक्षात आले कि आपण जो उपचार करत आहोत त्यामध्ये आपण रुग्णाचे पूर्ण समाधान, अथवा रुग्ण पूर्ण बरा करु शकत नाही. आपण फक्त तात्पुरते रुग्णांना बरे करत आहोत. पूर्णत: समाधान देऊ शकत नाही व त्यांना फसवेगिरी जाणवली. त्यामुळे त्याचे सेवांमध्ये रस वाटेना. त्यामुळे त्यांनी काही वैद्यकीय पुस्तके भाषांतर करण्याचे काम सुरु केले दरम्यान भाषांतर करताना एक The Cullens Mataria Medica  नावाचं पुस्तक भाषांतरित करत असताना त्यामध्ये असे आढळून आले की Chincona Bark नावाचे औषध हिवतापासाठी वापरले जाई, पण त्याच्या खालचा मुद्दा असे नमूद केले होते, की जर निरोगी माणसाने त्याचे सेवन जर केले, तर त्यालाही हिवतापासारखी लक्षणे दिसतात, त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला ते खटकले. त्यांनी स्वत: त्याचा रस पिऊन बघितला, त्यांना हिवतापासारखी लक्षणे जाणवली त्यांनी नंतर घरातील व्यक्तींनाही ते औषध देऊन बघितले. त्यानाही त्याच प्रकारे लक्षणे जाणवली.

येथेच होमिओपथि या वैद्यकीय शाखेचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी विविध औषधे स्वत:वर तपासून बघितली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, ज्या औषधामध्ये आजारासारखी लक्षणे तयार करण्याची ताकत आहे, तेच औषध तो आजार बरा करू शकते, हे नैसर्गिकरित्या सिद्ध झाले तो “सम समा समायान्ति” Natur s law of Cure SIMILIA SIMILIBUS CURANTER . त्यानंतर अनेकविध औषधाच्या चाचण्या करुन अनेक प्रकारे अभ्यास करुन काही नियमावली तयार केली, काही सिद्धांत मांडले .

दरम्यानच्या काळात विविध समस्यांना प्रतिकार करत त्यांनी आपले संशोधन चालू ठेवले व त्यांची अथक परिश्रमानंतर होमिओपथी हे वैद्यकीय शास्त्र अस्तित्वात आले अशा थोर संशोधकास त्रिवार प्रणाम.

होमिओपथिक औषधाचा योग्य वापर करुन अनेक शस्त्रक्रियाही टाळता येऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. तसेच आजकाल त्रासदायक ठरलेल्या विषाणूजन्य आजारांवर चिकुनगुनिया,डेंग्यू, काविळ, कांजण्या, गोवर, आदी आजारावर ही औषधे गुणकारी आहेत. आपण माझ्या चिकुन गुनियावरील संशोधनाबद्दल परिचित आहातच, आज हे कार्य जगभर होत आहे याचा आम्हाला आभिमान वाटतो.

पुन्हा एकदा अशा थोर संशोधकास त्रिवार वंदन व प्रणाम.

(या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)