 लातूर : महाराष्ट्रात व देशातही मागच्या तीन ते चार वर्षांपासून चिकुनगुणिया या रोगाने थैमान घातले होते. मराठवाड्याला तर या रोगाच्या साथीने पुरते त्रस्त करून टाकले होते. ग्रामीण भागात ‘अकडा’ नावाने संबोधल्या जाणा-या या रोगाने त्रस्त लोकांना उपचारापूर्वी मरणयातना सोसाव्याच लागल्या पण उपचारा नंतरही दरवर्षी थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास होणे, सांधे सुजणे असे प्रकार होतच असतात. या रोगावर मात करण्याची आणि रुग्णाला हमखास बरे करण्याची जिद्द एका मराठी डॉक्टरने बाळगली आणि त्यावर होमिओपॅथीचा रामबाण उपचार शोधून काढला. ‘नो इंजेक्शन, नो अॅडमिशन, नो सलाईन्स आणि नो अॅक्युपंक्चर’ असा नारा देत केवळ होमिओपॅथीच्या संशोधित औषधाव्दारे हजारो रुग्णांना या रोगापासून मुक्ती देण्याचे काम हा डॉक्टर मागच्या तीन वर्षांपासून करतो आहे. त्यांच्या या कार्याचा गौरवही झाला आहे आणि आता या विक्रमी कामाची गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद करण्याची तयारीही सुरू झाली आहे. या ध्येयवेड्या डॉक्टरचे नाव आहे संजय सोनवणे. डॉ. संजय सोनवणे यांच्या घोडेगाव (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथील आनंद रुग्णालय व संशोधन केंद्रात चिकुनगुणियाने त्रस्त रुग्ण येताना नातेवाईकांच्या आधाराने येतो, त्याला उचलून आणावे लागते. मात्र जाताना तो स्वतःच्या पायावर चालत जातो. हजारो रुग्णांनी स्वतः याचा अनुभव घेतला आहे, हा चमत्कारच असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र, हा चमत्कार नाही तर डॉ. सोनवणे यांच्या संशोधनाचे फळ आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना शिर्डी येथे आर. आर. पाटील यांच्या हस्ते ंंंंंं‘कार्यगौरव’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. चिकुनगुणिया प्राथमिक अवस्थेत असेल तर डॉ. सोनवणे यांचे हे औषध रुग्णाला अवघ्या पंधरा मिनिटांत व्याधीपासून मोकळे करते. मात्र रोग जुनाट असेल किंवा खूप उशिराने रुग्ण आला असेल तर १५ दिवस ते १ महिन्याचा कालावधी त्याला पूर्णपणे दुरुस्त करण्यास लागतो. पुण्यातून ‘बीएचएमएस’ ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतून सीसीएच पूर्ण करणा-या डॉ. संजय सोनवणे यांना मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांत रुग्णालय थाटून मोठ्या प्रमाणावर पैसा कमावता आला असता. मात्र, गरजू आणि साधनसुविधांच्या अभावाने जीव गमवाव्या लागणा-या ग्रामीण जनतेच्या सेवेचा संकल्प या धडपड्या तरुण डॉक्टरने बाळगला आणि घोडेगाव येथे रुग्णालय थाटले. निष्ठेने केलेल्या कार्याने अल्पावधीत या रुग्णालयाचे संशोधन केंद्र कधी झाले आणि देशातच नाही तर विदेशातही ते परिचित कधी झाले, हेही कुणाला कळले नाही. केवळ चिकुनगुणियाच नाही तर पांढरे डाग, दमा आणि इतरही काही दुर्धर रोगांवर डॉ. संजय सोनवणे यांनी संशोधन केले आहे आणि समाजकार्य म्हणून आपली सेवा उपलब्ध करून देत आहेत. रुग्णाला इंजेक्शन, सलाईन्सशिवाय किंवा शस्त्रक्रियेशिवाय दुरुस्त करण्यासाठी ते कार्यरत आहेत. सेवेच्या या अखंड व्रताचा आता वटवृक्ष झाला आहे आणि त्यांच्या कार्याची दखल विक्रम म्हणून जागतिक पातळीवर घेण्याची तयारी सुरू आहे. ‘कार्यगौरव’ पुरस्काराबरोबरच त्यांना यापूर्वी ‘आदर्श बहुजन मित्र’ ,‘समाजभूषण’ हे पुरस्कारही मिळाले आहेत. रुग्णांचे समाधान आणि होमिओपॅथीवरील दांडगा विश्वास हीच डॉ. संजय सोनवणे यांची शिदोरी आहे. या मराठी डॉक्टरचा झेंडा साता समुद्रापार फडकावा आणि जगात भारताची छाती अभिमानाने फुलावी हीच शुभेच्छा.
|
No comments:
Post a Comment