सकाळी उठताना सांधे आखडणे, हात-पाय दुखणे, जिना चढताना त्रास होणे, अगदी अंघोळ किंवा स्वयंपाक करतानाही वेदना जाणवणे — ही अनेक रुग्णांची आजची वास्तव परिस्थिती आहे.
अनेकांना वाटते की ताप उतरला म्हणजे चिकुनगुनिया पूर्ण बरा झाला…
परंतु प्रत्यक्षात काही रुग्णांमध्ये Post Chikun Guniya Syndrome दीर्घकाळ टिकू शकतो.
संचालक — आनंद हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, घोडेगाव
यांनी ग्रामीण भागातील हजारो रुग्णांवर केलेल्या अभ्यासातून असे आढळून आले की, चिकुनगुनियानंतर अनेक रुग्णांना महिनोनमहिने सांधेदुखी, कडकपणा, थकवा आणि हालचालींमध्ये अडचणी जाणवत राहतात.
संशोधनावर आधारित समन्वित उपचारपद्धती, जीवनशैली मार्गदर्शन आणि रुग्णानुसार वैयक्तिक उपचार योजना यामुळे अनेक रुग्णांना दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत करता आले आहे.
घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर — 414607
“ताप गेला म्हणजे आजार पूर्ण गेला असे नसते…
सांध्यातील वेदना शरीर देत असलेला इशारा असू शकतो.”

No comments:
Post a Comment