सुस्वागतम ... सुस्वागतम .... सुस्वागतम


सुस्वागतम ....सुस्वागतम ....सुस्वातम ....

आपले आरोग्यम धनसंपदा या विशेष ब्लॉग मध्ये स्वागत आहे , या विशेष ब्लॉग मध्ये बरेचश्या किचकट , कठीण आजारांवर योग्य पद्धतीने उपचार करणे कसे शक्य आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सुचनाचे नक्कीच आम्ही स्वागत करू , आपल्या आभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत . तेव्हा आपला अभिप्राय नक्की नक्की कळवा ......
आपलाच - डॉ. संजय सोनवणे पाटील ,
घोडेगाव, ता. नेवासा जि . अहमदनगर

संपर्क -- 9822287376

email- drsonawanesd@gmail.com
Whatsapp - 9762378492

IMO FREE CALLING AND CHAT @ 9762378492



Fashion

सुस्वागतम , सुस्वागतम आपले सहर्ष स्वागत आहे . आपण ब्लॉग पाहून आपल्या प्रतिक्रिया / संपर्क Email.- drsonawanesd@gmail.com नक्की नक्की कळवा संपर्क - आनंद हॉस्पिटल घोडेगाव ,शनी शिंगणापूर जवळ ता.- नेवासा , अहमदनगर , महाराष्ट्र मो.- ९८२२२८७३७६ फोन- ९२२६८८५१९४ आपण चिकुन गुनिया ,दमा, संधीवात ,पांढरे दाग याने त्रस्त आसल तर कायमस्वरूपी उपचारासाठी आजच संपर्क करा /पूर्व नियोजित वेळेसाठी 9822287376 / 9226885194 किव्हा drsonawanesd@gmail.com वर संपर्क करा प्राप्त पुरस्कार - आदर्श बहुजन मित्र , समाज भूषण , समाज प्रबोधन २००८ ( नासिक येथे उप. जिल्हाधिकारी श्री . शेखर गायकवाड यांचे उपस्तितीत ) कार्यगौरव पुरस्कार ( शिर्डी येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे हस्ते ) संत एकनाथ महाराज स्मृती गौरव पुरस्कार मा. ना.श्री. वसंत पुरके ( उपाध्याक्ष्य . महाराष्ट्र विधान सभा, मा. शिक्षण मंत्री )यांचे हस्ते, त्याच प्रमाणे ६ जानेवारी २०१२ रोजी जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमास मा..आ.प्रा. राम शिंदे यांचे आध्यक्षते खाली ,मा.श्री . विक्रमसिंह पाचपुते (परिक्रमा शैकक्षनिक संकुल ) . मा.श्री. विजयकुमार पोटे ( माध्यम विश्लेषक औरंगाबाद ) , पी . ल शिरसाठ (अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ .,महाराष्ट्र ) संदीप कोकडे ( प्रांताधिकारी कर्जत विभाग ) आदी. उपस्थित होते.सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय संस्था,आसेगाव बाजार जि अकोला व राजे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वितरीत करण्यात येणारा सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यपुरस्कार नुकताच डाँ संजय सोनवणे यांना प्रदान करण्यात आला गेल्या 14 वर्षापासुन वैद्यकीय क्षेत्रात असामान्य काम करीत असतांना, पांढरे डाग चिकनगुणीया अश्या अनेक आजारावर नवनवीन शोध प्रणालीचा वापर करून रुग्णांची सेवा करुन खरया अर्थाने सामाजीक सेवेचा कळस रचणार्या आगदी चिकुनगुनियाची नोद गिनीज बुक पर्यंत मजल गाठणाऱ्या डाँ संजय सोनवणेंचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला केलेले हा मानाचा मुजराच होय. whatsapp:- 9762378492

Wednesday, August 15, 2018

पांढरे दाग .... बरे  होऊ शकतात का ?
++++++++++++++++++++++++++++

       
         यावर उत्तर म्हणजे हो, नक्कीच बरे होऊ शकतात..
औषधी , काही पथ्ये काळजी घेऊन ., सगळ आयुष्य  शापिताप्रमाणे  जगण्यापासून व इतर लक्षणांपासून  होणारा  त्रास तुम्ही कायमचा थांबवू शकता .
      योग्य उपचार आणि काळजी घेऊन तुम्ही या किचकट आजारापासून मुक्ती मिळवू शकता .




औषधी चालू केल्यांनतर , चालू आसताना हा फरक जाणवेल
--   पांढरे दाग दिसण्याचे प्रमाण कमी होऊ लागेल .
--  पुढील वाढ थांबवली जाईल
--  शाररिक  कुरूपता येणार नाही
-- तुम्ही सर्व सामान्य आणि कार्यशील जीवन जगू शकाल

टीप -
    कित्येक जन पांढरेडाग  होण्याची प्रवृत्ती  घेऊनच जन्माला येतात , तो वंश परमपरेने येऊ शकतो , पूर्वीच्या  पिढ्यातील पांढरे दाग असलेल्या लोकांना  आयुष्य भर कुंठीत जीवन व्यतीत करावे लागत होते , पण आत्ता आधुनिक संशोधित होमिओपॅथिक औषधांमुळे तुम्ही पांढरे डागांवर चांगे नियंत्रण व उपचार करून पूर्णतः बरे होऊ शकता व इतरांसारखे सुंदर आयुष्य  जगू शकता .
     कधी कधी  पांढरे दाग अनेक पिढ्या ओलांडून पुढे जातो , त्यामुळे कुटुंबातल्या प्रत्येकाला  पांढरेदाग होतातच आसे नाही , आईला किव्हा वडिलांना  पांढरेदाग असतील तर मुलांना होईलच आसेही  नाही .

           आपल्या मुळे इतरांना पांढरे डागांचा संसर्ग होईल याची काळजी करू नका , तसे होणार नाही कारण हा सांसर्गिक  किव्हा संसर्ग जन्य आजार नाही .

अंगावर पांढरे दाग का येतात ?
======================
    तुमच्या त्वचेची  रचना ;-




  

  

पांढरे दाग या विकारात काय होते  हे जाणून घेण्यासाठी  आपणास त्वचेची रचना माहिती हवी .

त्वचा हि अंतत्वचा  आणी बाह्यत्वचा च्या आवरणानी तयार झालेली आसते , त्यात अनेक थर आसतात , त्यातील Stratum Granulosumआणी  Stratum Germinatum या दोन्ही थरांमध्ये मेलानोब्लास्ट नावाच्या पेशी आसतात , त्यांच्या पासुन मेलानोसाईट नावाच्या पेशी तयार होतात , त्या मेलानिन नावाचे रंगद्रव्य तयार करत आसतात ..

          त्वचेला  रंग हा  मेलानिन् नावाच्या रंग देणाऱ्या रंग मुळे आपल्याकडे गव्हाळी अथवा सावळा रंग त्वचेला  येतो , तो रंग शरीर मध्ये असणाऱ्या मेलानीन घटकावर अवलंबून आसतो .

       अर्थात  योग्य रीतीने त्वचेला रंग देण्यासाठी  पुरेशे मेलानीन युक्त मेलानोसाईट नावाच्या  पेशी आसने गरजेचे आहे . परंतु पांढरेडाग हे खालील सर्वसामान्य स्थितीत  मेलानीन चे प्रमाण कमी होते व त्वचा पांढरी दिसु लागते ....
 -- मेलानोसाईट पेशी व्यवस्तीत  कार्य करत नाहीत
--- क्षमता कमी होणे .
--  त्यांचा नाश होणे .
-- शाररिक गुंता गुंतीच्या प्रक्रिया
--  मेलानोसाईट विरोधी औषधांचा वापर जसे कि फेअरनेस  क्रीम.
--  यामुळे त्वचेवर पांढरे दाग दिसू लागतात .


   यावरून आपणास समजले आसेल कि बाह्य उपचारांनी तुम्हाला तात्पुरते  बरे वाटते आथवा काहीच बद्दल का होत नाही , बाहेरून लावलेले उपचार दीर्घ काळ आराम किव्हा आजार कायम स्वरूपी बरा करू शकत नाहीत कारण शरीरामध्येच आजाराची प्रवृत्ती  असल्याने आतूनच आजार बरा होणे गरजेचे आहे , महत्वाचे आहे आणि योग्य आहे .

      मेलानीन चे प्रमाण शरीरामध्ये कित्ती आहे यावर आजाराचे स्वरूप ठरते .

रुग्णांना उपचार घ्याला हवेत इतके गंभीर आहे का ?
-------------------------------------------------------------
   काहीजण  आपल्याला पंढरेदाग हा विकार जडला आहे हे मान्य करायलाच तयार नसतात . शक्यतो ते उपचार घेण्याचे टाळतात , कदाचित या आशेवर जगतात कि हा विकार आपोआपच बारा होईल .
            तुम्हाला  माहिती आहे का  पांढरे दाग आसल्यानंतर  तुमच्या आयुष्यात काम व  इतर व्यवहार करताना काही अडचण येणार नाही परंतु मानसिक व सामाजिक ताण नक्कीच जाणवेल व या मानसिक ताणामुळे झोप न  लागणे व्यसनाधीनता , सततच्या ताण-तणावामुळे या गोष्टी मुळे अनेक अडचणी येऊ शकतात. या गोष्टी पांढरेडागा पेक्षा मानसिक कुचंबना  पांढरे डागापेक्षाही गंभीर विकार व अत्यंत धोकादायक ठरू शकते.
    जरी तुम्हाला छोटासा पांढरा दाग आसेल , फार सौम्य आसेल तरीही सुरुवाती पासून त्याचे योग्य चांगले नियंत्रण करणे  आवश्यक आहे त्यावर उपचार केले नाहित किव्हा केलेले उपचार  योग्य ठरत नसतील तर तो तुमच्या त्वचेला कायम स्वरुपी हानी पोहचवू शक्कतो .

टीप =
    पांढरे दाग  अचानक यायला वाढीस कारणीभूत होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत काही जनात  थोड्या गोष्टीचा परिणाम होतो आपल्या बाबतीत कोणते ‍‌कारणे करणीभूत आहेत हे ओळखण्यासाठी  आकाशवाणी वरील कार्यक्रम ऐकावा.. या लिंक तुम्ही youtube  किव्हाwww.drsanjaypatil.blogspot.in किव्हा मला whatsapp ९७६२३७८४९२ या न. वर संपर्क करून आपणास उपलब्द होऊ शकतील .

पांढरे डागांवर रामबाण उपाय
*************************
            पांढरे डागांवर रामबाण उपाय अस तुम्ही ऐकल आसेल वाचलही आसेल , या बाबतीत तुम्हाला तुमच्या  मित्रांकडून आणि कुटुंबियांकडून  देखील सल्ला मिळेल , पण लक्षात ठेवा योग्य माहिती तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडूनच मिळेल , या उपचारांचा विचार करण्याआधी  डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या , कारण शास्त्रीय आधार  नुसत्या दाव्यांपेक्षा अधिक  सुरक्षित आहे .

कोणती  औषधी मला मद्दत करतील
****************************
 पांढरे डागावर  योग्य उपचार म्हणजे  तुमच्या लक्षणावर नाही तर पूर्ण शाररिक , मानसिक , विकारावर नियंत्रण , उपचारामध्ये काही औषधे आजारासाठी , काही प्रतीबंधानात्म्क  काही शारारीसाठी  पोषक प्रमाणात घ्यावी लागतात .

प्रतिबंधक औषधी
**************
   ही औषधी योग्य प्रमाणात मेलानोसाईट पेशींना उत्तेजन . पुनरूत्पादन करून मेलानीन तयार करून नवीन पांढरे दाग येऊ नये म्हणून उपयुक्त ठरतात
.

पोषक द्रव्ये

 काही शरीरासाठी मेलानीन तयार करण्यासाठी लागणारी पोषक द्रव्ये  जसे कि काँपर , झिंक , सेलेनियम आदी जीवनसत्वे या उपचाराबरोबर दिली जातात कि जेणे करून  मेलानीन लवकर व योग्य प्रमाणात तयार होईल .
   पोषक द्रव्ये या उपचार पद्धतीत  पांढरे डागांवर आराम मिंयासाठी वापरली जातात परंतु  ते आजाराचे मुळ  कारण मेलानोसील द्रव्याची कमतरता नियंत्रण करू शकत नाहीत .
टीप –
  तुमच्या आजाराची  तीव्रता अथवा आकारमान , तुमची अनुवंशिकता ,  तुमची शाररिक ठेवण यावरून डॉक्टर तुम्हाला कोणते औषध द्यायचं ते ठरवतील .


औषधी  कोणती व कशी घ्यायची

 पांढरे दाग ही व्याधी तुमच्या त्वचेवर परिणाम  करते आजाराचे स्वरूप जरी आपणास बाह्य दिसत आसले तरी ही तुमची त्वचा ही शररिक व मानसिक विस्कळीतपनाचा  आरसा आहे .
   पांढरे दाग हे तुमच्या बिघडलेल्या मानसिक व शाररिक असंतुलनाचा ईशारा आहे .
  पांढरे दाग ही शरीराची एक प्रवृत्ती असल्याने ती शरीराच्या आतून औषधे घेऊन जाने गरजेचे आहे .
बाह्य उपचारांनी तुमची त्वचा तात्पुरती रंग दिल्यासारखी वाटेल परंतु ते सुख क्षणिक असून त्यामुळे हे दाग आणखी जास्त ठिकाणी दिसू लागतात .
    अर्थातच आजाराचे मुळकारण शरीरातून आहे तर आजार सुद्धा आतूनच बरा होणे आवश्यक आहे बाह्य उपचार हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून तात्पुरताच फरक सुद्धा  तात्पुरताच दाखवतात व त्यामुळे हा आजार  पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो.

       परंतु  ज्यावेळी  पोटातून औषधी घेऊन आजार बरा होतो . त्याची पुन्हा होण्याची  शक्यता जवळ-जवळ नसतेच .
टीप-
जग भरत लक्षावधी लोक या आजाराने व्यापेले आसून योग्य उपचारा अभावी यांची संख्या वाढत चालली आहे.
 होमिओपॅथिक उपचार पद्धतीने डॉक्टरांनी आतापर्यंत अनेक रुग्ण कायमचे बरे केले आसून अनेक रुग्णांचे  औषधोपचार चालू आहेत .

काही काल्पनिक  गोष्टी आणि वैद्यकीय सत्य

 पांढरे दाग उपचारात steroids  वापरली जातात हे खरे आहे का ?
 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
डॉक्टरांची  उपचार पद्धत ही  होमिओपँथिक आहे .आणि होमिओपँथिक उपचार पद्धतीत शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आसते ,steroids  ही औषधी प्रतिकार शक्ती कमी करणारी आहेत त्यामुळे ही वापरली  जातच नाहीत .

पांढरे डागांच्या उपचारांनी अंगावर फोड येतात का ?
+++++++++++++++++++++++++++++++++
 वैद्यकीय  सत्य –
   नाही हे  पूर्णता चूक आहे पोटातून औषधी  घेतल्यानंतर अंगावर काही फोड  येत नाहीत , पण आपण काही औषधी लावून उन्हात बसत आसल तर फोड नक्की येऊ शकतात .

होमिओपॅथिक औषधांनी आधी दाग वाढतात नंतर कमी होतात.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
  हा आजाराच मुळात  वाढणारा असल्यामुळे  सुरुवातीला  जो पर्यंत औषधी लागु होत  नाही तो पर्यंत  आजार अवधल्या सारखा वाटेल परंतु होमिओपॅथिक औषधांनी  आधी  दाग वाढतात नंतर कमी होतात हे साफ चुकीचे आहे .

माझ्यामुळे हा आजार इतरांना होऊ शकतो  का ?
++++++++++++++++++++++++++++++++
      हा काही संसर्ग जन्य  आजार नाही त्यामुळे स्पर्शाने किव्हा इतरांचे कपडे वापरल्याने तो इतरांना होऊ शकत नाही.


मला  बरे वाटल्यानंतर मी औषधी बंद केली तर  चालतील का ?

      तुमच्या डागांचे आकारमान अथवा दाग कमी होऊ लागल्यानंतर तुम्हाला तुमचा आजार  नियंत्रणात येत आहे  याची कल्पना येईल . त्यामुळे डॉक्टर तुमची औषधांची मात्रा कमी जास्त करतील  परंतु  काही औषधी चालू ठेवावी लागतील त्यानंतर तुम्ही पूर्ण  बरे व्हाल .

  बरे वाटायला लागणे  म्हणजे  तुम्हाला त्रास दायक लक्षणे  नाहीयेत पण याचा अर्थ असा नाही कि तुमचा आजार पूर्णतः  नाहीसा झाला आहे .
       त्यासाठी  डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये  व  औषधी  वेळेवर व त्यासाठी सांगितलेली पथ्ये पाळणे गरजेचे आहेत , आजार पूर्ण  बारा झाल्यानंतर डॉक्टर स्वतः औषधी बंद करतील.

औषधी चालू आसताना  कोणती पथ्ये पाळावीत
++++++++++++++++++++++++++++++++
 आजार हा किचकट असल्याने यावर मात करण्यासाठी औषधांबरोबर काही पथ्ये पाळणे  गरजेचे आहे , काही पथ्ये न पाळणे हे आजाराची लक्षणे वाढवतात तर काही पथ्ये न पाळल्याने  औषधांचा योग्य परिणाम होत नाही.
 उदा. या गोष्टी टाळाव्यात..
  चहा
 कच्चा कांदा , लसुण , मेथी , मुळा, कोथंबीर ,
 फक्त कच्चे वर्ज्य
 वेलदोडे, लवंग,दालचिनी, औषधी पदार्थ .
 हिंग युक्त  , लोणचे
 आयुवेर्दिक औषधी
 जिरे मोहरीचे पदार्थ  
मला सर्व सामान्य जीवन  जगता येईल का ?
+++++++++++++++++++++++++++++++
  हो नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेतले आणि काही पथ्ये पाळली  काळजी घेतली कि झाल .

     तुम्ही  आत्ता पेक्षा अधिक निश्चित व मनमोकळे पणाने कुठलीही  हीन भावना न ठेवता आयुष्य जगू शकता .काही पथ्ये व औषधी वेळेवर घेतली तर हा बरा ना होणारा आजार  पूर्णतः बरा होऊ शकतो .

     त्रास बरा झाल्यानंतर  पुन्हा होणार नाही नेहमी तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकाल व दिवसभर कार्यशील राहून तुम्ही रात्री शांत झोपही घेऊ शकता व इतराप्रमाणे  आपण ही सुंदर आहोत ही भावना  तुमच्यात  आपोआपच  जागृत होईल .

 तर  मग  व्हा पुढे आणि आत्मविश्वासाने  जीवन व्यतीत  करा  तुम्हा जे करायचे आहे ते करा  जे आयुष्यात  मिळवायचे ते मिळवा.  

             तुम्हाला  हार्दिक शुभेच्छा  

टीप –  
  डॉक्टरांनी  दिलेली  औषधी वेळेवर घेणे
 पथ्ये पाळावे , योग्य आहार , योग्य व्यायाम  व्यवस्तीत चालू ठेवा .
जर विशिष प्रकारची Allergy आसेल  तर डॉक्टरांना तशी कल्पना द्या .
 योग्य  होमिओपॅथिक संशोधित औषधानी तुम्ही  तुमच्या पांढऱ्या डागांवर  योग्य  नियंत्रण  मिळवू शकता आत्ता हे सर्व  तुमच्या हातात आहे .

तुमचा आजार वाढत आहे याची चिन्ह
++++++++++++++++++++++++++++
  डागांचा रंग अधिकच  पांढरट  होत  चालला आसेल .
  नवीन  ठिकाणी दाग दिसायला सुरुवात झाली आसेल
 डागांचे आकारमान वाढत  आसेल  तर ....
    ही आजार वाढण्याची लक्षणे आहेत

आजार बळकावत आहे आसे वाटल्यास काय करावे
+++++++++++++++++++++++++++++++++
 वेळ न दवडता  आपण डॉक्टरांशी संपर्क  साधा .



तुम्हाला  याची उत्तरे  मिळाली  कि मिळते .............

    सुरक्षितता
             आत्म विश्वास
                          बंधनमुक्त जीवन

टीप –
 या लेखातील  माहिती  असंख्य  पिडीत रुग्ण आणि डॉक्टर  यांच्या अनुभवावर आधारित आहे तथापि  ती वैद्यकीय  सल्ल्याला  पर्याय म्हणून नाही .

   कोणत्याही  स्वरूपाचा  उपचार  सुरु करण्या आधी  डॉक्टरांशी  संपर्क साधा  ......
                        धन्यवाद

         पुनश्च  हार्दिक शुभेच्छा......



लागला ओ एका मुलीचा संसार सुखाला .... नांदा सौख्यभरे 






लागला ओ एका मुलीचा संसार सुखाला .... नांदा सौख्यभरे ..

                साधारण तीन चार वर्षांपूर्वीची गोष्ट आसेल  रुटीन प्रमाणे हॉस्पिटल चे कामकाज चालु होते एक व्यक्ती चार वेळा आत डोकावून भेटण्याची इच्छा व्यक्त करत होता , कॅमेर्यात तर आजारी ही  वाटत नव्हता न कुणी रुग्ण बरोबर होते , गरबड चालु असल्याने थोडे थांबायला सांगितले पण नाही , विशेष काही काम पण नाही , रुग्णही नाही पण डॉकटरानाच भेटायचे आहे .असा आग्रह काय काम असावे बरे , किव्हा काय कटकट असावी एकदा बघूनच घ्यावे या वैतागलेल्या भावनेने त्यांना बोलावले तर काय हातात एक पेढ्याचा बॉक्स , आणि डोळ्यांत न मावणारे पाणी .... मलाच थोडेसे अपराधी पनाची जाणीव झाली आपण काय कटकट आहे म्हणून मनात विचार करून बोलावले , पेढ्याचा बॉक्स आणि डोळ्यात न मावणारे पाणी हे पाहून मीही थोडा स्तब्धच झालो , आणि पुढील संवाद चालु झाला ....
 ओळखले का डॉक्टर साहेब ?
अस्सा  गुगली प्रश्न केल्याने मी ही गोधळून गेलो , हा म्हणावे कि नाही म्हणावे , चेहरापट्टी थोडी परिचित यदाकदाचित भेटल्यासारखी वाटत होती पण नेमकी ओळख तर पटत नव्हतीच ,, मी काही म्हणण्याच्या अधिच तुमच्या काय लक्षात राहणार डॉक्टर साहेब  ?  तुमच्या कडे येणारे जाणारे  दिवसाभरात कित्ती ? कसे लक्षात येंणार , आसे म्हणाल्याने  मी सुटलो .  
   पण मी नाही विसरलो डॉक्टर साहेब , तुम्ही आमच्यावर खूप मोट्ठे उपकार केले आहेत , त्याचीच एक गोड बातमी देण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे , कृपया मला माफ करा , मलाही माहित आहे पेशंट चालु असताना मध्ये येणे चांगले नाही पण , मला दमच निघांना कधी तुम्हाला भेटतोय आसे झाले , म्हणूनच मध्येच  घुसलो ...
मी बोला म्हणायच्या  आधीच त्यांनी  बोलणे सुरु केले , त्यांना हातानेच विनंती करून बसण्यास सांगितले ...
डॉक्टर साहेब  , २/३  वर्षांपूर्वी तुमच्याकडे आलो होतो तुमच्या लक्षातही नसेल , तायडीला मुलगा झालाय , तुमच्या मुळे तायडीचा संसार झालाय आणि माझे हि कुटुंब वाचलंय , तायडीला  मुलगा झालाय , मी पाहिलांदा पेढे घेऊन आलोय तुमच्यासाठी कधी तुमची भेट घेतोय आसे झालाय पहिले पेढे घ्या आसे म्हणून बॉक्स मधून पेढे देण्यासाठी उठला  वर पाहतोय तर आवाज हि घोगरा झाला होता डोळ्यातून पाणी लपवता येत नव्हते , एक  बापाचा जिव काय आसतो ते जाणवत होते पेढे हातात घेतले आणि  उरलेलं सर्व बाहेत बसलेल्या रुग्णांना वाटून द्यायला सांगितले आणि क्षणात दोन तीन वर्ष मागे गेलो ......
      वेळ सकाळी ९ / १० ची  नुकतीच ओपीडीची सुरवात झाली होती काही रुग्णांची  तपासणी झाल्यानंतर एक २१/ २२ वर्षाची तरुणी आणि एक मध्यम वर्षीय गृहस्त ओपिडीला आले ,
             डॉक्टर खूप  लांबून तुमचे नाव  ऐकून आलोय पण काही फायदा होईल कि नाही माहिती नाही पण खूप जणांनी तुमचे नाव सुचवले म्हणून आलो आहे . रिपोर्ट आणलेत का , मी विचारले नेहमी प्रमाणे , पिशवीमधून भले मोठ्ठे रिपोर्ट माझ्या समोर ठेवत आसताना डॉक्टर सगळे डॉ. झाले गावापासून
स्पेशिया लिश्ट पर्यंत सर्व त्वचारोग  तद्यांना हि दाखवले पण काही उपयोग झाला नाही . (  एव्हाना माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही कि काही त्वचा विकाराने  ग्रस्त आहेत म्हणून ). देव  धरम सर्व काही झालाय डॉक्टर आता तुमच्या कडे शेवटचा उपचार नाहीतर तिचे नशीब आणि ती ? आसे म्हणून  थोडी निराशा व्यक्त केली , आणि शुन्यातच पाहू लागला ..
  कुठून आला आहात ?  काय त्रास होतोय ? आपणास कशी माहिती मिळाली आशी आपली नेहमी प्रमाणे सुरुवात .. काही वयक्तिक माहिती सांगितल्यानंतर मी मूळ  मुद्यावरच आलो काय त्रास होतोय .. डॉ. थोडा पांढरे डागाचा त्रास  आहे ,  त्यांच्या पेक्षा त्या नालायाकांचा  खूप त्रास झालाय  थोडे  आवेगानेच बोलला , थोडे शांत करून , थोडे शांत व्हा होईल सगळे व्यवस्थित आसे मी बोलल्यावर थोडे आणखीच त्याला अस्वस्थ वाटू लागले , नशिबच फुटलाय तुम्ही काय कराल ? नशीबच करंट आसे म्हणून तो स्तब्धच झाला .. आता  मला पुढे जाने गरजेचेच होते मी त्या मुलीला विचारायला सुरुवात केली  तिने जे सांगितले ते थोडक्यात .. सारांश ...
 डॉ. मी  दिपाली ...
      मी BA केलय आणि सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय , दोन वर्षांपूर्वी  श्री . योगेश बरोबर झाले ते मेकानीकॅल इंजिनियर आहेत नासिक ला .
लग्न मोठ्या धामधुमीत झालाय खूप छान संसार चालु होता . आगदी मनासारखा नवरा भेटला म्हणून मीही खूप खुष  होते पण काय झाले ६  महिन्यात माझ्या संसाराला दृष्ट लागली , माझ्या मानेवर एक छोटा नायटा सारखे थोडी  पुरळ आली  थोडे दुर्लक्ष्य झाले , नंतर थोडी खाज आल्याने  डॉक्टरांना दाखवले , डॉक्टरांनी काही औषधी दिली , नायटा  कमी झाला खाज हि कमी झाली पण थोडासा पांढरट व्रण तिथे राहिला  त्या नंतरही डॉक्टरांना दाखवले पण काही विशेष नाही आणि बरे होईल आसे सांगून डॉ. मागे पाठवले . परंतु समाधान न झाल्याने दुसर्या  डॉ. दाखवले  थोडी विटामिन आणि कॅल्सियम कमतरता असल्याने हे झाले असेल म्हणून सांगितले , १५ -२०  दिवसानंतर हि वाढत गेल्यानंतर त्यांनी त्वचारोग  तज्ञाशी संपर्क करण्याचे सांगितले , त्यांच्या म्हणण्यानुसार त्वचारोग तद्ण्यानाही दाखवले त्यांनी काही औषधी लावून उन्हात बसण्याचे सुचवले आणि बरे होईल काळजी करू नका आसे सांगितलं ५ -६ महिनी उपचार घेऊनही काही खास  फरक पडेना , शेवटी आम्हीच म्हणलो  डॉक्टर हा कोड , पांढरे डागांचा तर प्रकार  नाही ना ?  आता डॉक्टरांनाही प्रश्न पडला होता काय सांगावे पण ते हि म्हणाले हो  vitiligo म्हणून प्रकार आहे काळजी करायचे कारण नाही बरे वाटेल पण वेळ लागेल , आसे म्हणून त्यांनी वेळ मारून नेली , आणि माझ्या आयुष्याचे संसाराचे सूर्याला  ग्रहण लागावे आणि हळूहळू अंधार वाढत जावा तसे माझ्या संसाराला ग्रहण लागले ....
          डॉक्टर  काय सांगावे आणखी दारातल खरकट नाही उचललं आणखी , किरानावाल्याची उधारी द्यायची राहिली आहे या दागांपेक्षा या नालायक लोकांनी खूप त्रास दिलाय .... संतापाने मधेच  मुलीचे वडील बोलले ..
काय  झालय  ?
             हे डाग  लग्नानंतर आले त्यात माझी काय किव्हा मुलीची काय चुक ? आम्हाला फसवलं म्हणतात , लग्नाआधीच त्रास असेल त्यामुळेच आत्ता त्रास झाला , तुम्ही लपवून आमची फसवणूक केली आता पुढे तू पूर्ण पांढरी होणार आणि मुला बाळांना हि त्रास होणार , त्यामुळे खूप कटकटी वाढल्यात ३ महिण्यापासून  पोरगी इकडे माहेरी आणून  घातलीय तुम्हीच सांगा कसे शांत राहू आसे म्हणून त्याला रडूच कोसळले १० मिनिटांपूर्वी रागीट  वाटणारा बाप ढसाढसा रडत होता ....
काळजी करू नका देवावर विश्वास ठेवा नक्कीच सर्व व्यवस्थित होईल म्हणून आपण काही मार्ग नक्की काढू माझ्यावर विश्वास ठेवा  म्हणून मी सांगितले,
डॉक्टर आत्ता देवावर हि भरोसा राहिला नाही , आता तुम्ही म्हणताय तर बघु डोळे पुसत पुसत ती व्यक्ती बोलत होती , थोडा माझ्यावर भरोसा ठेवा  जमेल ना  ?

  पुढे पूर्ण केस स्टडी  झाल्यानंतर जेव्हा डाग बघितला तर खूप काही नव्हतेच कि ज्याने एवढे महाभारत घडावे आसे , एक छोटा डाग मानेवर केसांच्या खाली दिसतही नव्हता ,पण त्या डागणे पूर्ण आयुष्य बरबाद होण्याच्या मार्गावर होते , आगदी  फारकती पर्यंत प्रकरण गेले होते , आणखी दोन बहिणी लग्नाच्या राहिल्या होत्या आणि आता जर हे प्रकरण फारकतीने मिटणार असेल तर दोन्ही लग्नाला आडचन या विचाराने बापाचे आणखी टेंशन  वाढत होते ...
हे सर्व समजून घेऊन थोडे या विषयी counselling केल्यानंतर उपचार हि  चालु केले , काही पथ्ये समजावून सांगितले , काही महिन्यामध्ये  काही चमत्कार व्हावा असा फरक जाणवू लागला  प्रथम उपचाराआधी १ फोटो घेतला उपचार चालु आसतांना एक आणि आगदी उपचार बंद करण्याच्या वेळी शेवटचा फोटो घेतला , तो आपणासाठी समाविष्ट करत आहे ,
डॉ. सामुअल हनेमान यांच्या म्हण्यानुसार  नुसते शाररीक व्यधी बरे करणे म्हणजे उपचार नाही तर रुग्णाचे मानसिक , सामाजिक पुनर्वसन करणेही गरजेचे आहे .
Physician High and only mission is restore sick to health to cure as it termed … Aporism 1st Oraganon Of Medicine . Called Bible Of Homoeopathy
 शाररीक  आजार तर आत्ता  पूर्ण  झाला  होता , आणि हि गोष्ट सासरीही समजली होती. मध्यंतरीच्या काळात मी सासरच्या व्यक्तीचा फोन करून भेटण्याची विनंती केली होती ..
तद्नंतर एक दिवस सासरची मंडळी नवरा मुलगा , त्यांच्या गावातील काही प्रतिष्टीत व्यक्ती आपल्या  हॉस्पिटल ला बोलावून घेतले दोघांचेही गैरसमज मनातून काढून टाकले, हा काही मोठ्ठा आजार नाही , काही संसर्गजन्य आजार नाही, याची पूर्ण माहिती दिली आणि मुलांनाही होणार नाही याचीही माहिती दिली , आधीचा डाग आणि आता  कुठे आहे हे दाखवा म्हणून विचारले मुलगा थोडे शरमेनेच डॉक्टर चुकले आमचे , खूप  मोठ्ठा गैरसमज झाला होता यातून माझ्या संसाराचेही वाटोळे झाले आसते , तुमच्या मुळे सर्व काही ठीक  झाले मला क्षमा करा.. म्हणून  तो पायाकडे झुकला त्याला सांभाळत , चूक माणसाकडूनच होत आसते  आणि  माफी मागायलाही खूप मोठे मन लागते , तुम्ही खूप मोठ्या मनाचे दिलदार आहात काही शंका नसावी , मुलीला जीव लावा योगेशराव आसे मी म्हणून उभे केले ...
  आता  मुलीला कधी घेऊन जाणार योगेश ? डॉ. का लाजवता उद्या परवा नक्कीच घेऊन जाणार... 
 काही दिवसांनी योगेश दीपालीला घेऊन गेला , संसार हि आगदी व्यवस्थित चालु  झाला आज योगेश आणि दीपालीला मुलगा झालाय आणि एक आजोबा नातू झालाय म्हणून , ज्यांचामुळे हे सगळे सुव्याव्स्थ्तीत झाले त्या डॉक्टरांना आजोबा पेढे घेऊन एक आठवण म्हणून आठवणीने पेढे घेऊन आले होते ... आसो

 आसे प्रसंग क्वचितच काही डॉक्टरांच्या बाबतीत घडतात . त्यात मी स्वतःला भाग्यवान समजतो , तसे मी तर काहीही केले नव्हतेच उपचार करणे तर माझे कर्तव्य होतेच हेही मी पैसे घेऊनच केले होते , आणि फक्त एक सामाजिक जबाबदारी म्हणून दोघाचे प्रबोधन केले  होते  , एवढेच एक सामाजिक उपक्रम ...
हे सर्व माझ्या डोळ्यापुढून जसा एखादा चित्रपट चालावा तसे जात होते ..
तेवढ्यात डॉक्टर पेढे खा , आणि  बाकी रुग्ण आता आरडओरड करत होते नक्कीच खूप वेळ गेला , कसा गेला कळलेच नाही . पुढील रुग्ण विचारू लागले कोण होते बाबा , काय झाले होते ... माझ्या  मनातून आणि ओठातून एकाच वाक्य निघाले ...

लागला ओ एका मुलीचा संसार सुखाला ... 

नांदा सौख्य भरे ...
मनातून केव्हाच आशीर्वाद निघून गेले ...


Tuesday, July 3, 2018

आपण आजचा एकमत पाहिलंय का ?
आज कोड विषयी माझ्या लेखाचा २ रा भाग प्रकाशित झालाय
आभारी श्री. मंगेश डोंग्रजकर सर आणि एकमत टीम...

लातूर येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक एकमत मध्ये मा. श्री. मंगेश जी डोंग्रजकर सरांनी जागतिक कोड दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेला लेख ... खूप खूप धन्यवाद सर जी
http://epaper.dainikekmat.com/edition/3009/sakshi/page/7






Wednesday, April 11, 2018


ABP MAZA

http://abpmajha.abplive.in/blog/blog-on-founder-of-homeopathy-christian-fridrich-samuel-hahnemann

Image may contain: 2 people

10 एप्रिल हा दिवस वैद्यकीय क्षेत्रातल्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. दि. 10 एप्रिल 1755 या दिवशी ख्रिस्तिअन गोत्फ्रिएड हॅह्नेमॅन (Christian Gottfried Hahnemann ) यांच्याकडे एक बालकाचा जन्म झाला या बालकाने ख्रिस्तिअन फ्रेड्रिक सम्युअल हॅह्नेमॅन (Christian Fridrich Samuel Hahnemann ) पुढे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती करून होमिओपथि या वैद्यकीय शाखेचा शोध लावून संशोधन करुन मानवतेच्या हितासाठी व आजारी रुग्णासाठी आयुष्य वेचलं. त्यांनी आयुष्यामध्ये अनेक अडचणीचा सामना करत आपल्या निश्चयावर ठाम राहून या वैद्यकीय शाखेचे महत्त्व पटवून दिले.

 

ख्रिस्तिअन फ्रेड्रिक सम्युअल हॅह्नेमॅन यांचा अल्पपरिचय

सुरुवातीला घराची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना बालपणी शाळा शिकता आली नाही. आई-वडिलांनी त्यांना घरीच लिहिणे वाचणे शिकवले, त्यानंतर 20 जुले 1767 मध्ये त्यांच्या गावातल्याच प्रिन्स स्कूलमध्ये जावू लागले. त्यांची हुशारी पाहून सर्वजण त्यांना जीव लावत असत, त्यांचे मुल्लर (Dr . muller) नावाचे शिक्षक तर त्यांचा मुलाप्रमाणे सांभाळ करत.

वेळप्रसंगी त्याची शाळेची फी सुद्धा ते स्वत: भरत असत. वयाच्या 20 व्या वर्षी पुढील अभ्यासासाठी लेप्सिक (Leipsic) मध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी रवानगी झाली. परिस्थितीने व वडिलांनी त्यांना एक शिकवण दिली होती, की सर्व गोष्टी अनुभवूनच अंगिकार व चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात करा . त्यानंतर त्यांनी Verna मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व MD पदवी मिळवली.

वैद्यकीय सेवा (1779- 1792)

या दरम्यानच्या काळात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवला पण त्यात त्यांचे मन रमेना, कारण त्यांच्या लक्षात आले कि आपण जो उपचार करत आहोत त्यामध्ये आपण रुग्णाचे पूर्ण समाधान, अथवा रुग्ण पूर्ण बरा करु शकत नाही. आपण फक्त तात्पुरते रुग्णांना बरे करत आहोत. पूर्णत: समाधान देऊ शकत नाही व त्यांना फसवेगिरी जाणवली. त्यामुळे त्याचे सेवांमध्ये रस वाटेना. त्यामुळे त्यांनी काही वैद्यकीय पुस्तके भाषांतर करण्याचे काम सुरु केले दरम्यान भाषांतर करताना एक The Cullens Mataria Medica  नावाचं पुस्तक भाषांतरित करत असताना त्यामध्ये असे आढळून आले की Chincona Bark नावाचे औषध हिवतापासाठी वापरले जाई, पण त्याच्या खालचा मुद्दा असे नमूद केले होते, की जर निरोगी माणसाने त्याचे सेवन जर केले, तर त्यालाही हिवतापासारखी लक्षणे दिसतात, त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला ते खटकले. त्यांनी स्वत: त्याचा रस पिऊन बघितला, त्यांना हिवतापासारखी लक्षणे जाणवली त्यांनी नंतर घरातील व्यक्तींनाही ते औषध देऊन बघितले. त्यानाही त्याच प्रकारे लक्षणे जाणवली.

येथेच होमिओपथि या वैद्यकीय शाखेचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी विविध औषधे स्वत:वर तपासून बघितली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, ज्या औषधामध्ये आजारासारखी लक्षणे तयार करण्याची ताकत आहे, तेच औषध तो आजार बरा करू शकते, हे नैसर्गिकरित्या सिद्ध झाले तो “सम समा समायान्ति” Natur s law of Cure SIMILIA SIMILIBUS CURANTER . त्यानंतर अनेकविध औषधाच्या चाचण्या करुन अनेक प्रकारे अभ्यास करुन काही नियमावली तयार केली, काही सिद्धांत मांडले .

दरम्यानच्या काळात विविध समस्यांना प्रतिकार करत त्यांनी आपले संशोधन चालू ठेवले व त्यांची अथक परिश्रमानंतर होमिओपथी हे वैद्यकीय शास्त्र अस्तित्वात आले अशा थोर संशोधकास त्रिवार प्रणाम.

होमिओपथिक औषधाचा योग्य वापर करुन अनेक शस्त्रक्रियाही टाळता येऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. तसेच आजकाल त्रासदायक ठरलेल्या विषाणूजन्य आजारांवर चिकुनगुनिया,डेंग्यू, काविळ, कांजण्या, गोवर, आदी आजारावर ही औषधे गुणकारी आहेत. आपण माझ्या चिकुन गुनियावरील संशोधनाबद्दल परिचित आहातच, आज हे कार्य जगभर होत आहे याचा आम्हाला आभिमान वाटतो.

पुन्हा एकदा अशा थोर संशोधकास त्रिवार वंदन व प्रणाम.

(या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)

Friday, January 26, 2018

असा मी काय केला गुन्हा ??


वेळ सकाळी ११.३० , १२ ची

आहेत का डॉ. म्हणून एक मध्यम वयीन तरुणीने opd मध्ये प्रवेश केला , बघितलं तरी खूप संतापलेला , त्रासलेला आणि ग्रासलेला चेहरा ...

काय झालंय , आपला नेहमीचा प्रश्न ?

काय झाले नाही हे विचारा डॉ....

आणि रुग्णांनी त्याची कहाणी सांगण्यास सुरुवात केली ...त्याचा सारांश

मी ...
इतर मुली जसे संसाराचे मनी चित्र रंगवतात आगदी तसेच झाले , माझे शिक्षण सर्व आगदी व्यवस्तीत झाले , छान उपवर मुलगाही मिळला ..
संसार आगदी मजेत चालू होता , संसार वेलीवर पहिली मुलगी आत्ता १२ वर्षाची आहे आणि लहानी ९ ...... आत्ता काय आडचन आहे ..

आडचणी ला खरे तर सुरुवात झाली लहान मुलीच्या प्रेग्नान्च्सी नन्तर

गरोध्जार आसतांना पोटावर एक पांढरट डाग आला , डॉ ना दाखवले पण गरोधर पणा मुले होऊ शकते म्हणून दुर्लक्ष्य झाले , डिलेव्हरी हि व्यवस्थित झाली आणि संसार हि आगदी मजेत चालू होता,

पण आगदीच माझ्या संसाराला ग्रहण लागावे तसेच झाले , मागील काही दिवस दुर्लक्ष्य झालेला डाग आत्ता त्याचे स्वरूप दाखवू लागला , आत्ता काही डाग पायावर छातीवर आणि मानेवर फिक्कट रुपात दिसू लागले , गावातील स्थानिक डॉ .नी काही विटामिन्स ची कमतरता आसेल म्हणून उपचार करून पहिले काही परिणाम नाही

त्यानंतर शहरातीलत्वचा रोग तद्यांनी पांढरे डाग , कोड , निदान केले आणि माझ्या पायाखालील जमीन हलली , खूप दिवस उपचार केले काही फरक नाही , शेवटी डॉ. नी स्पष्ट सांगितली काही फरक होणार नाही ,आणि येथून माझा जीवन गाडा बदलला ...
घरीतील आपुलकीने वागणारी माणसे थोडी नाही चांगलीच बदलली एक तिरस्काराची वागणूक सुरु झाली , माझा हाताचा स्वयंपाक ,खाणे टाळू लागली , नवराही खूप बदलला , उठता बसता काय हि कर्माची फळे ? आशी टोमणी सुरु झाली, नंतर शाब्दिक चकमकी आणि कधी कधी मारझोड नन्तर दारू पिऊनही धिंगाणा होवू लागला ... हे सर्व सांगत आसताना डोळ्या तून केव्हाच पाणी सुरु झाले होते ...

माहेरी बरेच दिवस गेले तर माहेरी हि हीच कटकट लहान बहिणीचे लग्न जमायाचेय , आणि हि अवदसा घरात कसे होणार ....?

कधी कधी वाटायचे जीव द्यावा ... दोन तीन वेळा प्रयत्न हि केला पण नाही झाले

नवरा डागांमुळे माझ्या कडे लक्ष्य देईना , त्याचे बाहेत अफेर चालू झाले , त्यावेळी मी तेही स्वीकारले ....

आत्ता प्रकरण खूप पुढे गेलाय ५ वर्षांपासून कोर्टात केस चालू होती ,
घट स्पोट झालाय मागील महिन्यात निकाल लागलाय दोन्ही मुली नवरया कडे राहतात , मी एकटी सध्या आई वडिलांकडे राहते , माझ्या टेन्शन मुळे वडील हि दारू पिऊ लागले आहेत आणि २ वेळा हृद्य विकाराचा त्रास हि झाला आहे , सांगा डॉ. परमेश्वराने आता काय बाकी ठेवलाय , कोणता त्रास देण्याचे बाकी ठेवलाय ..मी असा काय गुन्हा केलाय कि पांढरे डाग माझ्याच वाट्याला आले आणि माझा पूर्ण संसार उद्वस्त झालाय ....

सांगा

सांगा

असा मी काय केलाय गुन्हा ??

निरुत्तर मी ..................................................

तुमचे नाव ऐकून तुमच्याकडे आलेय फरक होईल का ?

पहिले तर खूप काही नव्हते , किरकोळ आहे

मनात आले १० वर्षापूर्वी आली असती तर संताप , मनस्ताप आणि संसार हि वाचला आसता ...

परमेश्वरा काय रे तुझी किमया न जगू देत ना मरू देत , पावलो पावली मरण यातना दिल्यास रे तू ....

कशी रे तुझी किमया आम्हा पामरांना समजावून घे ....

@ डॉ. संजय ९८२२२८७३७६ , ९७६२३७८४९२